उस्मानाबादच्या एलसीबीनं 12.40 लाखाचा 62 किलो गांजा पकडला

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन –    तुळजापूर शहर परिसरातून अवैध गांजा वाहतुक होणार असल्याची गोपनीय माहिती स्था.गु.शा. च्या पोउपनि- श्री पांडुरंग माने यांना मिळाली होती. यावरुन मा. पोलीस अधीक्षक, श्री. राज तिलक रौशन, मा. अपर पोलीस अधीक्षक, श्री. संदीप पालवे स्था.गु.शा. चे पोनि- श्री गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा. च्या पोउपनि- श्री पांडुरंग माने, पोहेकॉ- प्रमोद थोरात, पोना- हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, पोकॉ- आरसेवाड, अविनाश मरलापल्ले यांसह तुळजापूर पो.ठा. चे पोनि- श्री मनोजकुमार राठोड, सपोनि- गणपत राठोड, पोउपनि- चनशेट्टी यांचे पथक व नायब तहसीलदार- चंद्रकांत शिंदे यांच्यासह दोन शासकीय पंचांच्या पोलीस पथकाने सापळयाची तयारी केली.

तुळजापूर- नळदुर्ग जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या लोकमंगल पेट्रोलियम केंद्राजवळ दि. 02.11.2020 रोजी रात्री 23.00 वा. पथकाने गोपनीय सापळा लावला. सापळ्या दरम्यान नमूद पेट्रोलीयम केंद्राच्या दक्षीण बाजूस असणाऱ्या पाण्याच्या टाकीजवळ एक मिनीट्रक क्र. के.ए. 39-8859 हा संशयीत रितीने उभा असलेला आढळला. पोलीसांनी त्या मिनीट्रकची झडती घेतली असता मिनीट्रक मधील विजयकुमार श्रावण मदनुरे, रा. दागडी, ता. भालकी, जि. बिदर, राज्य- कर्नाटक याने 3 पोत्यांत प्रत्येकी 10 गांजा पुडे असा एकुण 62.04 कि.ग्रॅ. गांजा अंमली पदार्थ अवैधपणे बाळगुन लपवून ठेवला असल्याचे आढळले. पथकाने विजयकुमार मदनुरे यास ताब्यात घेउन नमूद गांजा व मिनीट्रक, मोबाईल फोन जप्त केला.

यावरुन स्था.गु.शा. चे पोहेकॉ- प्रमोद थोरात यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद आरोपीविरुध्द एन.डी.पी.एस. कायदा कलम- 20 (ब), (ii) (c), 29 अन्वये गुन्हा आज दि. 03.10.2020 रोजी नोंदवला आहे