Osmanabad Cyber Police | ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपीला बिहारमधून अटक; उस्मानाबाद सायबर सेलची मोठी कारवाई

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – रिलायन्स फायनान्स कंपनीचा (Reliance Finance Company) व्यवस्थापक बोलत असल्याची बतावणी करुन एका व्यक्तीची ऑनलाइन आर्थिक फसवणूक (Online fraud) केल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणात उस्मानाबाद सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करुन उस्मानाबाद सायबर पोलिसांनी (Osmanabad Cyber Police) आरोपीच्या बिहार राज्यातून मुसक्या आवळल्या आहेत. हा प्रकार डिसेंबर 2020 मध्ये घडला होता. उस्मानाबाद सायबर पोलिसांनी (Osmanabad Cyber Police) आरोपीचा बिहारमध्ये 7 दिवस राहून शोध घेतला.

राहुल कुमार लखन प्रसाद लहेरी (वय- 21 रा. भागलपुर, राज्य बिहार) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरमी शरद नामदेव सिरसाठ (रा. सकनेवाडी, ता. उस्मानाबाद) यांनी उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्यात (Osmanabad Rural Police Station) फिर्याद दिली होती. पोलिसांनी आरोपी विरोधात 420 सह माहिती तंत्रज्ञान कलम 66(सी) (डी) प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास सायबर पोलिसांनी करुन आरोपीला अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शरद शिरसाठ यांना एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरुन फोन आला होता. फोन करणाऱ्या व्यक्तीने मी रिलायन्स फायनान्स कंपनीचा व्यवस्थापक बोलत असून तुम्हाला एक लाख रुपयांचे कर्ज मंजुर झाले असल्याचे सांगितले. तसेच सिरसाठ यांच्याकडून कर्ज प्रक्रियेसाठी 30,229 रुपये बँक खात्यात भरण्यास सांगितले. सिरसाठ यांनी त्या व्यक्तीने सांगितलेल्या बँक खात्या पैसे जमा केले. परंतु कर्जाची रक्कम मिळाली नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे सिरसाठ यांच्या लक्षात आले. त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी विरोधात फिर्याद दिली.

या गुन्ह्याचा तपास सायबर पोलीस ठाण्याचे (Cyber police station) अधिकारी आणि कर्मचारी करत होते.
सायबर पोलिसांनी आरोपीच्या मोबाईल क्रमांकाच्या तसेच बँक खात्याचे तांत्रिक विश्लेषण (Technical analysis) केले.
त्यावेळी हा गुन्हा गुन्हा राहुल लहेरी याने केल्याचे निष्पन्न झाले.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी बिहारमध्ये जाऊन आरोपीचा सात दिवस शोध घेऊन त्याला अटक केली.
आरोपीला मंगळवारी (दि.20) उस्मानबाद येथे आणण्यात आले.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक राज रोशन तिलक (Superintendent of Police Raj Roshan Tilak) यांच्या मार्गदशनाखाली सायबर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक अर्चना पाटील ( Police Inspector Archana Patil), पोलीस हेड कॉन्स्टेबल कुलकर्णी, पोलीस नाईक संजय हालसे, राहुल नाईकवाडी, गणेश जाधव, पोलीस कॉन्स्टेबल आकाश तिळगुळे, मकसुद काझी, अनिल भोसले, सुनिल मोरे, गणेश हजारे, विमल पौळ, नलावडे, अपेक्षा खांडेकर यांनी आरोपीच्या मोबाईल आणि बँक खात्याचे तांत्रिक विश्लेषण केले. तर पोलीस उपनिरीक्षक अनिल टोंगळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर रोकडे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश खैरे, बळीराम घुगे यांच्या पथकाने बिहारमध्ये जाऊन आरोपीचा शोध घेऊन अटक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक अर्चना पाटील (Police Inspector Archana Patil) या करत आहेत.

Web Title :- Osmanabad Cyber ​​Police | Arrested in Bihar for online fraud; Major operation of Osmanabad Cyber ​​Cell

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Porn apps Case | पॉर्न व्हिडीओ बनवून अपलोड केल्याप्रकरणी राज कुंद्रा आधी ‘या’ अभिनेत्रीला झाली होती अटक

Supreme Court | महाराष्ट्र सरकारला उपचाराचे दर ठरवण्याचा अधिकार नाही

Poonam Pandey | पूनम पांडेने देखील राज कुंद्रावर केले होते गंभीर आरोप; Video व्हायरल

Post Office News | 10 वी आणि 12 वी पास उमेदवारांना पोस्टात नोकरीची सुवर्णसंधी ! अनेक पदांसाठी भरती अन् 81100 पर्यंत पगार, जाणून घ्या