उस्मानाबाद : 24 बोग्यासाठी नव्या रेल्वे ट्रॅकचं उद्घाटन

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – उस्मानाबादचे रेल्वे स्टेशन कात टाकत असून एका वेळी एका प्लॅट फार्मवर 24 बोग्या उभारतील एवढ्या लांबीच्या नव्या रेल्वे ट्रॅकचे उद्घाटन शनिवारी (दि.14) खा. ओमराजे निंबाळकर यांचे हस्ते झाले.

उस्मानाबाद रेल्वे स्थानकात प्लॅट फार्म -1 व प्लॅट फार्म-2 असे दोन प्लॅट फार्म आहेत. या प्लॅट फार्मची लांबी कमी असल्याने सध्या या दोन्ही प्लॅट फार्मवर अठरा बोगी उभा राहु शकतात. बोगींची संख्या कमी असल्याने प्रवाशांना अडचणींना तोंड द्यावे लागते. ही बाब लक्षात घेवून रेल्वे प्रशासनाकडे रेल्वे बोगींची संख्या वाढविण्याची मागणी सातत्याने केली जात होती. या प्रयत्नाला यश येवून दोन्ही प्लॅट फार्मच्या रेल्वे ट्रॅकची लांबी वाढविण्यात आली. आता या ट्रॅकवर 24 बोग्या उभारु शकणार असल्याने प्रवाशांना रेल्वेतून प्रवास करताना अडचणीचा सामना करावा लागणार नाही.

तसेच प्लॅट फॉमृ क्रमांक 1 वर पांच नवीन निवारा शेडची उभारणीही करण्यात आली आहे. या पार्श्वभुमीवर 24 बोगी उभारतील एवढया लांबीच्या नवीन रेल्वे ट्रॅकचे व प्लॅट फार्म क्र. 1 वर नव्याने उभारण्यात आलेल्या पांच निवारा शेडचे उद्घाटन खा. ओम राजेनिंबाळकर यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कैलास पाटील,रेल्वे उपभोक्ता समितीचे सदस्य संजय मंत्री, लक्ष्मीकांत जाधव, सहाय्यक अभियंता श्री. दिक्षीत, वाणिज्य निरीक्षक श्री थोरात, स्टेशन मास्तर श्री गायमुखे, श्री. वेलोरे, कार्य निरीक्षक संजय भराटे उपस्थित होते.

पुणे येथे कांही महिन्यापुर्वी झालेल्या रेल्वेच्या बैठकीत हा विषय उपस्थित करण्यात आला होता. त्यावेळी जसा बोगी प्राप्त होतील. तशा उस्मानाबाद साठी उपलब्ध करुन देण्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले होते. नव्या रेल्वे ट्रॅकचे उद्घाटन झाल्याने कांही दिवसातच प्रवाशांच्या अडचणी कमी होतील हे नक्की.

आरोग्यविषयक वृत्त –