चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला, परंतु शाहू कॉलेजमध्ये प्रवेश न मिळाल्याने केली आत्महत्या

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – इयत्ता १० वी मध्ये त्याला ९४.२० टक्के गुण मिळाले, परंतु चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे आलेल्या नैराश्यातून एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना कळंब तालुक्यात उघडकिस आली आहे.

अक्षय शहाजी देवकर (१६) असे आत्महत्या करणाऱ्या मुलाचे नाव आहे.

१० वीच्या परीक्षेत मिळाले होते ९४.२० टक्के गुण

अक्षय देवकर याला त्याच्या वडिलांनी लातूरच्या साने गुरुजी माध्यमिक विद्यालयात शिक्षणासाठी ठेवले होते. दहावीचा निकाल लागला. १० वीत त्याला ९४.२० टक्के गुण मिळाले होते. त्यामुळे तो आनंदी होता.

शाहू महाविद्यालयात प्रवेश न मिळाल्याने घेतला गळफास

अक्षयचे वडिल शहाजी देवकर यांची देवळाली येथे पाच एकर कोरडवाहू शेती आहे. घरची परिस्थिती अत्यंत बेताची होती. परंतु तरीही त्यांनी त्याला लातूरच्या साने गुरुजी विद्यालयात शिक्षणासाठी ठेवले होते. अक्षयला चांगले गुण मिळाले. परंतु त्याला पुन्हा लातूरच्या राजर्षि शाहू महाविद्यालयात प्रवेश घेण्याची इच्छा होती. मात्र त्याला प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे त्याने राहत्या घरात गुरुवारी गळफास घेऊन आत्महत्या केली.

डॉक्टर होण्याची होती इच्छा

अक्षय हा अतिशय हुशार होता. त्याची डॉक्टर होण्याची इच्छा होती. त्यामुळे त्याच्या वडिलांनी प्रतिकूल परिस्थिती असतानाही त्याच्या शिक्षणासाठी धडपड सुरु केली होती. असे त्याच्या कुटुंबियांनी सांगितले.

सिने जगत –

अभिनेत्री उशोशी सेनगुप्‍ता म्हणाली, गप्प बसली असते तर झाली नसती ‘छेडछाड’ ; ७ गुंडाना अटक

‘माता-पिता की चरणों में स्वर्ग’ म्हणणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीचा ‘वाढीव’ लुक पाहिलात का ?

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन