उस्मानाबाद लोकसभेसाठी भाजपाकडून सुजितसिंह ठाकूर यांना उमेदवारी मिळण्याचे संकेत ?

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन- उस्मानाबाद लोकसभा मतदार संघ हा भाजपाला मिळावा म्हणुन उस्मानाबादचे भाजपाचे शिष्टमंडळ शेकडो कार्यकरते घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटले आहेत. त्यामुळे आमदार सुजीतसिंह ठाकूर यांना लोकसभेसाठी भाजपाकडून उमेदवारी मिळण्याचे संकेत दिसत आहेत.

उस्मानाबाद मतदार संघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो परंतू यावेळी मतदाराची नाराजी पाहून भाजपाच्या शिष्टमंडळाने हा मतदार संघ भाजपाकडे द्यावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे निवेदन देऊन केली आहे.

उस्मानाबाद येथील भाजपाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री फडणवीस यांची आज ता २७/२/२०१९ रोजी मुंबई येथील विधानभवनात साडेचार वाजण्याच्या सुमारास भेट घेतली व जिल्ह्यातील सद्यस्थीती सांगीतली. त्यामुळे उस्मानाबाद मतदार संघ हा लोकसभेसाठी भाजपाकडेच द्यावा आशी मागणी शिष्टमांडळाने लावून धरली होती. मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न करणार आसल्याची हमी दिल्याचे बोलले जात आहे. हा मतदार संघ भाजपाला दिल्यावर भाजपाकडून सुजीतसिंह ठाकूर हे उमेदवार असतील अशी माहिती भाजपाचे एस. पी.शुगारचे चेअरमन सुरेश पाटील यांनी सांगीतली आहे. आणि जर हा मतदार संघ भाजपाला नाही दिला तर आमचे शिष्टमंडळ हे दिल्लीला अमित शहा यांना भेटून मागणी करणार असल्याचेही सुरेश पाटिल यांनी सांगितले. यावरून आता युतीमध्येच उमेदवारीसाठी खेचाखेची सुरू झाली आहे. यावेळी आमदार सुजीतसिंह ठाकूर उस्मानाबादचे जिल्हाअध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, भाजपा मिडिया सेलचे जिल्हाध्यक्ष धनंजय रणदिवे , यांच्यासह शेकडो कार्यकरते उपस्थीत होते.