Osmanabad NCP | मल्हार आर्मीचे प्रमुख आणि मराठवाड्यातील धनगर समाजाचे नेते सुरेश कांबळे करणार राष्ट्रवादीत प्रवेश; ‘वंचित’ला धक्का

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – Osmanabad NCP | उस्मानाबाद येथील मल्हार आर्मीचे प्रमुख आणि मराठवाड्यातील धनगर समाजाचे नेते सुरेश कांबळे (Suresh Kamble) आता राष्ट्रवादीचे (Osmanabad NCP) घड्याळ हाती बांधणार असल्याचं समोर आलं आहे, यामुळे आता वंचित बहुजन आघाडीला एक (Vanchit Bahujan Aghadi) धक्का बसला आहे. येणाऱ्या 16 सप्टेंबर रोजी सुरेश कांबळे हे राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील (Jayant Patil) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार आहेत. यामुळे आता शहरात राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.

नुकतंच रविवारी साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhosle) यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
शिवेंद्रराजेंचे कट्टर समर्थक मानले जाणारे शशिकांत वाईकर यांनी 200 कार्यकर्त्यासह राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
त्यामुळे तो एक शिवेंद्रराजेंसह भाजपला (BJP) एक मोठा धक्का मानला जातो आहे.
यानंतर आता वंचित बहुजन आघाडीला धक्का बसला आहे.

सुरेश कांबळे (Suresh Kamble) यांनी वंचित बहुजन आघाडीकडून भुम परंडा वाशी मतदार संघात तानाजी सावंत आणि राहुल मोठे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती.
काल भूममध्ये कार्यकर्ता मेळावा घेत सुरेश कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे.
दरम्यान, इकडे लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर अखेर राष्ट्रवादीमध्ये (Surekha Punekar) अधिकृत प्रवेश करणार आहे.
येत्या 16 सप्टेंबरला मुंबई राष्ट्रवादी (NCP) ऑफिसमध्ये पक्षप्रवेशाचा सोहळा रंगणार आहे.
अजित पवारांच्या (Ajit Pawar) उपस्थितीत पुणेकर देखील राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधणार आहेत.

Web Titel :- Osmanabad NCP | Chief of Malhar Army and leader of Dhangar Samaj in Marathwada Suresh Kamble will join NCP

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Crime News | तब्बल 5 वर्षापासून महिला कॉन्स्टेबलचं डीएसपीसोबत होतं ‘लफडं’; पोलिस अधिकार्‍यामुळं तिनं सोडलं पतीला, 50 अश्लील व्हिडीओ

Gold Price Today | चांदीत मोठी घसरण, सोन्याचे दर वाढले; जाणून घ्या नवीन दर

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 254 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी