Osmanabad News | उस्मानाबादमध्ये उरुसासाठी जमलेल्या गर्दीत वळू उधळून 14 भाविक जखमी

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – Osmanabad News | उस्मानाबादमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये उरूस सुरु असताना अचानक वळू उधळल्याने 14 भाविक जखमी झाले आहेत. यामधील जखमींना उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हि घटना घडली तेव्हा त्या ठिकाणी जवळपास 15 हजार भाविक उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान वळू अचानक उधळल्याने भाविकांची धावपळ उडाली आणि मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. (Osmanabad News)

काय घडले नेमके?
उस्मानाबाद शहरात सध्या हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी रहे यांचा उरूस सुरू आहे. हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी रहे यांच्या धार्मिक सोहळ्यानिमित्त उस्मानाबादमध्ये हा उरुस असतो. दोन ते तीन दिवस हा उरुस चालतो. रात्रभर या उरुसात सहभागी होण्यासाठी भाविक गर्दी करत असतात. या उरुसाच्या कार्यक्रमासाठी विविध ठिकाणाहून तब्बल 15 हजार लोक आले होते. तेव्हा आज पहाटे तीनच्या सुमारास धार्मिक कार्यक्रम सुरू असताना अचानक एक अनियंत्रीत झालेला वळू भाविकांमध्ये शिरला. यादरम्यान वळू उधळल्याने भाविकांची मोठी धावपळ उडाली आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत 14 भाविक जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. (Osmanabad News)

 

 

पोलीस घटनास्थळी हजर
या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी हजर झाले.
यावेळी पोलिसांबरोबर वैद्यकीय पथकही घटनास्थळी दाखल झाले.
यावेळी पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण मिळवल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जखमींपैकी काहीजणांवर उपचार सुरु आहेत.
तर काहीजण उपचार घेऊन घरी परतले आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Web Title :- Osmanabad News | 14 devotees injured in osmanabad bull rushes in crowd gathered for urus

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mundhwa Premier League Cricket Tournament |‘मुंढवा प्रिमिअर लीग’ क्रिकेट स्पर्धा ! महाराणा रॉयल्स् संघाला विजेतेपद

Ahmednagar ACB Trap | 10 हजार रुपये लाच घेताना महिला वैद्यकीय अधिकारी ॲन्टी करप्शनच्या जाळ्यात