Osmanabad News | शेतात गेलेल्या पिता- पुत्रांचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू; उस्मानाबादमधील घटना

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – Osmanabad News | उस्मानाबादमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. शेतातील ज्वारीला पाणी देण्यासाठी विद्युत मोटार सुरू करण्यासाठी गेलेल्या पिता-पुत्राचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला आहे. हि दुर्दैवी घटना उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील मौजे निलेगाव या ठिकाणी घडली आहे. (Osmanabad News)
काय आहे संपूर्ण प्रकरण?
अर्जुन जमादार (वय 52वर्षे), गणेश जमादार (वय 16) वर्षे मृत पावलेल्या दुर्दैवी पिता-पुत्रांची नावे आहेत. तुळजापूर तालुक्यातील मौजे निलेगाव येथील शरणाप्पा अर्जुन जमादार , गणेश जमादार हे दोघे सोमवारी दुपारी १ वाजता निलेगाव शिवारातील गट नंबर 8 मधील शेतात ज्वारीला पाणी देण्यासाठी गेले होते. यावेळी विद्युत मोटार सुरू करण्यासाठी मोटारीचे बटण दाबताच शरणाप्पा अर्जुन जमादार आणि त्यांचा मुलगा गणेश जमादार यांना तीव्र विजेचा धक्का लागून दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच इटकळ औट पोस्ट येथील पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. यानंतर त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून नळदुर्ग पोलीस स्टेशन येथे आकस्मिक मृत्यूची नोंद केली. दरम्यान, मृत शेतकरी शरणाप्पा जमादार यांच्या माघारी आई, भाऊ, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. या दोघा पिता पुत्रांच्या अश्या दुर्दैवी मृत्यूने निलेगाव व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Osmanabad News)
सावकाराच्या जाचाला कंटाळून दोन सख्ख्या भावांनी घेतले विष
नाशिकमध्ये देखील सावकारी जाचाला कंटाळून दोन सख्ख्या भावांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.
यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे तर दुसऱ्याची प्रकृती चिंताजनक आहे. कर्जबाजारी पणाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली आहे. या दोघांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोटसुद्धा लिहिली होती. या घटनेमुळे संपूर्ण नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली होती.
Web Title :- Osmanabad News | father and son died due to electric shock while trying to start an electric motor
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Onkar Bhojane | अभिनयाच्याबाबतीत ओंकार भोजनेने दिले स्पष्टीकरण; म्हणाला – ‘मला पटलं नाही तर…’