Osmanabad News | तुळजापूरचे माजी आमदार आलुरे गुरुजी यांचं 90 व्या वर्षी निधन

उस्मानाबाद न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –   Osmanabad News | तुळजापूर (Tuljapur) तालुक्याचे माजी आमदार सी. ना. आलुरे यांचे सोमवारी पहाटे निधन झाले. सोलापुरातील रुग्णालयात मागील 8 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. ते 90 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर दुपारी 3 नंतर अणदूर (Anadur) या गावी अंत्यसंस्कार होणार (Osmanabad News) आहेत.

तुळजापूर तालुक्याचे माजी आमदार आणि गुरुजी या नावाने परिचित असलेले सी. ना. उर्फ सिद्रामप्पा आलुरे (Sidramappa Alure) यांनी राजकीय व सामाजिक क्षेत्राबरोबरच शैक्षणिक क्षेत्रात देखील आपल्या कार्याचा ठसा उमटवला होता. आलुरे गुरुजींनी शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. ते 1980 मध्ये काँग्रेस पक्षाकडून सर्वप्रथम आमदार झाले होते. तसेच त्यांनी शेकापचे तत्कालीन विद्यमान आमदार माणिकराव खपले यांचा 14 हजार 579 मतांनी पराभव करून विजय मिळविला होता. 1985 ला मात्र आलुरे गुरुजी यांचा पराभव झाला. त्यावेळी शेकापचे माणिकराव खपले यांचा विजय झाला होता.

 

Web Title : Osmanabad News | former mla alure guruji passes away he breathed his last hospital solapur

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Indian Railway Recruitment 2021 | आयटीआय पास तरुणांसाठी नॉर्थ सेंट्रल रेल्वेत 1664 पदांवर बंपर भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

Indian Railways News | RAC सीट मिळाल्यानंतर प्रवास न केल्यास तिकिटाचे पैसे IRCTC परत करते का?, जाणून घ्या रेल्वेचे नियम

Pune Crime | पुण्याच्या मांजरी खुर्दमध्ये तरूणावर तीक्ष्ण हत्याराने वार करून खून, प्रचंड खळबळ