मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 4.5 लाखांची रक्कम जमा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   कोरोनाच्या संकट काळात उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने आज मुख्यमंत्री सहाय्यता निधी देण्यात आला. साडे चार लाखांची मदत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील पवार यांनी उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ- होळे यांच्याकडे हा निधीचा (४ लाख ५३ हजार ४९६) चेक सुपूर्द केला आहे.

देशात आज कोरोना आजाराने थैमान घातले आहे. अडीच महिने देश पूर्णपणे बंद होता. त्यावेळी अनेक दानशूर व्यक्तीने मुख्यमंत्री सहाय्यता निधी दिला. कळंब येथील मोहेकर महाविद्यालयाने देखील मदतीचा हात पुढे केला आहे.

महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे माहे मे २०२० च्या वेतनातून कपात ही रक्कम सहायता निधी मध्ये जमा केली. कळंबकाराकडून कौतुक केले जात आहे.