‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर उस्मानाबाद पोलिसांचे Anti Corona Cops, 700 तरुण घालणार गावाच्या सीमांवर गस्त

उस्मानाबाद : पोलिसनामा ऑनलाइन – ग्रीन झोन असणाऱ्या जिल्हात 37 दिवसानंतर दोन दिवसांपूर्वी फळ वाहतूक करणाऱ्या परंडा येथील चालकाला कोरोनाची लागण झाली. यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आणि पुन्हा जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचले असून उस्मानाबाद जिल्हा अधीक्षकानी पोलीस एक नाविन्यपुर्ण उपक्रम सुरू केला आहे. अँटी कोरोना क्रॉप्स पथक स्थापन केले आहे. त्यांच्या मदतीस जिल्ह्यातील 700 तरुण मदत करणार आहेत.त्यांचे “ग्राम रक्षक दल” स्थापन केले आहे.

पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांनी प्रत्येक पोलीस ठाण्या मार्फत या वॉरियर्सना ओळखपत्रे, लाठी, शिट्टी, टॉर्च, वाटप केली आहेत. प्रथम स्वत: सुरक्षीत राहुन इतरांना सुरक्षीत ठेवता यावे या करीता त्यांना मास्क, सॅनिटायझर, ओडोमॉस इत्यादी आवश्यक वस्तुंचेही वाटप करण्यात आले आहे.

कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या सोलापूर जिल्हा सिमे लगत असनाऱ्या खडकी, देवकुरुळी, धोत्री ता.तुळजापूर या गावांतील Anti Corona Corps (ACC) यांना भेटून कर्तव्या विषयी मार्गदर्शन करुन “आपली सुरक्षा आपल्या हाती” असते हे समजावून त्यांना कामकाजाबाबत सुचना केल्या. दरम्यान खडकी येथे ॲन्टी कोरोना कॉर्प्स (ACC) यांना मास्क, सॅनिटायझर, ग्लुकोज, ओडोमॉस इत्यादी साहित्य वाटप केले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे व तामलवाडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नितीन मिरकर तसेच सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व गावकरी उपस्थित होते.

जिल्ह्यातील 749 गावांपैकी 706 गावांत ‘ग्राम रक्षक दले’ स्थापन केली आहेत. मा. पोलीस अधीक्षक श्री. राज तिलक रौशन यांनी केलेल्या आवाहनावरुन गावातील- ग्राम रक्षक दलातील सुद्रुढ व इच्छुक असे 7,000 पेक्षा जास्त युवक कोरोना वॉरियर्स म्हणुन कार्य करण्यास स्वेच्छेने पुढे आले आहेत. या वॉरियर्सला उस्मानाबाद पोलीस दल प्रात्साहित करीत असुन हे Anti Corona Corps (ACC) पोलीस दलाच्या खांद्यास खांदा लाउन दिवसपाळी- रात्रपाळी असे अहोरात्र आपापल्या गावात, जिल्हा सरहद्दीवर, प्रवेश मार्गांवर स्वेच्छेने कार्यरत आहेत. अशा प्रकारे ते पोलीस बंदोबस्तास हातभार लावत आहेत.

सदरचे Anti Corona Corps (ACC) मधील तरुण हे आपापल्या गावांत सुरक्षे विषयी खालील प्रमाणे कार्य करतात.

1. गावातील नागरीकांमध्ये कोरोना रोगापासून सुरक्षे विषयी जनजागृती करत आहेत.

2. बाहेर गावाहुन, जिल्ह्यातून, राज्यातून आपल्या गावात ज्या व्यक्ती लॉकडाऊन काळात आल्या आहेत. त्यांची माहिती गावपातळीवरील समितीला देत आहेत.

3. गावातील होम क्वारंटाईन व्यक्तींवर देखरेख करीत आहेत.

4.गावातील गरजू व्यक्तींना शासनामार्फत मदत मिळण्याबाबत मार्गदर्शन करीत आहेत.

5. पोलीस बंदोबस्तासोबत दिवसपाळी- रात्रपाळी मध्ये हजर राहुन जिल्ह्याची/ गावाच्या सरहद्दीवर संरक्षण करीत आहेत.

मा. पोलीस अधीक्षक श्री. राज तिलक रौशन यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील गावांत कार्यरत असणाऱ्या या Anti Corona Corps (ACC) यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.