उस्मानाबाद पोलीस दलातील 7 जणांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर

पोलीसनामा ऑनलाइन –  पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल उस्मानाबाद पोलीस दलातील 7 पोलीसांना पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह प्राप्त झाले आहे. महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला प्रत्येक वर्षी पोलीस दलात उल्लेखनीय काम करणाऱ्या पोलिसांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर केले जाते. गुरुवारी राज्यातील 800 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर करण्यात आले आहेत. यात उस्मानाबाद जिल्हा पोलिस दलातील 7 जणांचा समावेश आहे.

कैलास लहाने, उपनिरिक्षक, नळदुर्ग, पोलीस ठाणे
श्रीनिवास घुगे, सहाय्यक उपनिरिक्षक-
प्रदीप जाधव, सहाय्यक उपनिरिक्षक-
सुकूमार बनसोडे, पोलीस हवालदार
आत्माराम जाधव, पोलीस हवालदार-तुळजापूर, पोलीस ठाणे,
सुनिल कोळेकर, पोलीस हवालदार, कळंब, पोलीस ठाणे,
रामेश्वर उंबरे, पोलीस हवालदार- पोलीस मुख्यालय

सन्मानचिन्ह प्राप्त झाल्याबद्दल उस्मानाबाद पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन व अपर पोलीस अधीक्षक संदीप पालवे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.