Osmanabad Police | आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला; डोळ्यात चटणी टाकून पोलिसांना बेदम मारहाण; PSI जखमी

परांडा : पोलीसनामा ऑनलाइन – Osmanabad Police | आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या उस्मानाबाद पोलिसांच्या (Osmanabad Police) पथकाच्या डोळ्यात चटणी टाकून काठ्या, कुऱ्हाडीने मारहाण (Beating) करुन प्राणघातक हल्ला (Deadly Attack) केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक राजकुमार ससाणे (PSI Rajkumar Sasane) हे गंभीर जखमी झाले आहेत. तसेच पथकातील पोलीस (Police Squad) कर्मचारी देखील जखमी झाले आहेत. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. ही घटना सोमवारी (दि.4) परांडा शहरापासून (Paranda City) काही अंतरावर असलेल्या कुर्डुवाडी रोडवरील पाटील वस्तीवर (Patil Vasti) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, औदुंबर प्रकाश पाटील (Audumbar Prakash Patil) यांच्या शेतीच्या वादातून गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. यावेळी पोलीस (Osmanabad Police) पथक पाटील वस्तीवर उमाकांत पाटील (Umakant Patil) याच्याकडे चौकशीसाठी गेले होते. चौकशी दरम्यान तपास अधिकारी राजकुमार ससाणे व उमाकांत पाटील यांच्यात बाचाबाची झाली. याचे रुपांतर हाणामारीत झाले. उमाकांत पाटील, कृष्णा उमाकांत पाटील, रामराजे उमाकांत पाटील, पल्लवी उमाकांत पाटील, मुकुंद उमाकांत पाटील, गोविंद उमाकांत पाटील यांनी अचानक पोलीस पथकावर कोयता, दगड, काठीने हल्ला केला.

पथकातील पोलीस कॉन्स्टेबल शबाना मुल्ला (Police Constable Shabana Mulla) यांनी या घटनेची माहिती परांडा पोलीस ठाण्यात (Paranda Police Station) दिली. पोलिसांवर हल्ला झाल्याची माहिती मिळताच पोलीस ठाण्यातून पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलीस घटनास्थळी येताच पाटील कुटुंबाने पोलिसांच्या डोळ्यात चटणी फेकून दगडफेक केली. तर पोलीस उपनिरीक्षक ससाणे यांना घरात कोंडून काठी आणि कुऱ्हाडीने मारहाण केली.

दोन तासाच्या थरारानंतर ससणे पोलीस कर्मचारी अजित कवडे (Ajit Kavade),
योगेश यादव (Yogesh Yadav) यांची पाटील कुटुंबाच्या तावडीतून सुटका करण्यात आली.
या प्रकरणी पल्लवी उमाकांत पाटील, कृष्णा उमाकांत पाटील यांना ताब्यात घेतले आहे.
तर उर्वरित आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले आहेत.
दरम्यान, जखमी पोलीस उपनिरीक्षक ससाणे आणि कर्मचाऱ्यांना उपचारासाठी
उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Web Title : Osmanabad Police | osmanabad deadly attack on paranda police squad who went to arrest the accused

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Bharti Singh Good News | सुप्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंहच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन, दिला गोंडस बाळाला जन्म..!

 

Retired DySP Dilip Shinde Passes Away | निवृत्त पोलीस उप अधीक्षक दिलीप शिंदे यांचे पुण्यात निधन

 

Neetu Singh Kapoor Viral Dance Video | वयाच्या 63 व्या वर्षी नितू कपूरनं दिली चक्क नोरा फतेहीला टक्कर,
डान्स पाहून तुम्हीही होताल थक्क !