उस्मानाबाद : स्मार्ट ग्रामपंचायतीकडून सॅनीटायझेशन करण्यासाठी गावच्या प्रवेशद्वारावर ‘चेकपोस्ट’ व ‘फाँगिंग बोगदा’ कार्यान्वित

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – कळंब तालुक्यातील स्मार्ट ग्रामपंचायतीचा मान मिळविणाऱ्या गावाने आता मानसासोबतच वाहने देखील सॅनीटायझेशन करण्यासाठी गावच्या प्रवेशद्वारावर स्वतःचा चेकपोस्ट व फाँगिंग बोगदा कार्यान्वित केला आहे. राज्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. गावात येणारे आणि बाहेर जाणाऱ्या लक्ष ठेवले जात आहेत पण त्यांच्या नोंदी देखील ठेवण्याचे काम केले जात आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात 4 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या सीमा बंद आहेत. अत्यावश्यक सेवा वगळून सर्व आस्थापना बंद आहेत. दरम्यान कळंब तालुक्यात कन्हेरवाडी हे 4 ते 5 हजार लोक संख्या असणारे गाव. वेगवेगळ्या उपक्रम राबविणारे गाव म्हणून कन्हेरवाडी गावचा उल्लेख केला जातो. त्यामुळे स्मार्ट ग्राम पंचायत असा बहुमान देखील मिळाला आहे. आता याच गावकऱ्यांनी कोरोनापासून वाचण्यासाठी आणि त्याच्याशी दोन हात करत लढण्यासाठी कोरोना प्रभावीत भागातून येणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवत येत आहे. यातूनच गावाच्या मुख्य प्रवेशद्वारावर सॅनीटायझर असा मोठा बोगदा तयार करण्यात आला आहे. मानसच नाही तर वाहने देखील यात सॅनीटायझ होऊन निघतात. त्यामुळे गावाबाहेर जाताना आणि आत येताना पूर्ण निर्जंतुकीकरण होत आहे. तसेच बाहेरहून आलेल्या लोकांची नोंद, गृहभेटी देवून त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवणे व अत्याधुनिक तंत्राचा वापर करत फवारणी करणे असे विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत.

ग्रामविकास समितिचे अध्यक्ष अॅड रामराजे जाधव, सरपंच अॅड वर्षा जाधव, उपसरपंच मधूकर मिटकरी स्मार्ट ग्राम सर्व सदस्य व ग्रामस्थांच्या सहकार्यातून हा उपक्रम राबवण्यात आला आहे.

शेती व अन्य कामानिमित्त लोकांना गावाबाहेर पडावे लागत आहे. तर लोक अत्यावश्यक कामासाठी गावात येत होती. यामुळे निर्जंतुकीकरण करून प्रवेश द्यावा, येणाऱ्या व जाणाऱ्यांची नोंद रहावी, यासाठी हे सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

कन्हेरवाडी ग्रामपंचायतने गावाच्या प्रवेशद्वाराजवळ चेकपोस्ट कार्यान्वित केला आहे. याठिकाणी ग्रापच्या घंटागाडीचा चालक, शिपाई व आशा कार्यकर्ती अंगणवाडी कार्यकर्ती आणी पोलीस मित्र ग्रामसुरक्षा दल अशा तिघांच्या ड्यूटी लावल्या आहेत. याशिवाय आम्ही स्वतः अधुनमधून थांबतो असे अॅड रामराजे जाधव यांनी सांगितले.

कन्हेरवाडी गावात जाण्यासाठी चेकपोस्ट व प्रमाणे ‘फाटक थांबा’ तयार केला आहे. तो कायम बंद असतो. वाहन आल्यावर तो वर उचलला जातो. यानंतर ये-जा करणारे प्रत्येक वाहनास थांबवले जाते. मग ती गावातील दुचाकी असो की, अन्य चारचाकी. त्यांचा नंबर, नाव, गाव, नंबर व कारण विचारुन व त्यांची नोंद करून सोडण्यात येते. या चेकपोस्टवर फॉगींग बोगदा तयार केला आहे. याठिकाणी प्रवेश करण्यापुर्वी वाहन व व्यक्तिवर निर्जंतुकीकरणाच्या उद्देशाने स्प्रे फॉंगीग केली केली जाते. यानंतर नोंद घेवून सोडण्यात येते.