home page top 1

उस्मानाबादमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच, दुकान फोडून सव्वा चार लाखांचा माल लंपास

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – शहर व परिसरातील कृषीपंप व शेती अवजारांचे व्यापारी संजय नंदकिशोर मंत्री यांचे देशपांडे स्टँड परिसरातील मंत्री मशिनरी व सबमर्सिबल पंप हे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी चार लाख २२ हजारांचा माल लंपास केला आहे. ही घटना शनिवारी रात्री घडली. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली असून अज्ञात चोरट्यांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिवारी रात्री दुकान बंद केल्यानंतर रात्री उशिरा ते रविवारी पहाटेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या पूर्व बाजूच्या शटरचे टाळे तोडून व शटर उचकटून आत प्रवेश केला. दुकानातील महागडे साहित्य त्यांनी हातोहात लंपास केले. यात ८९ हजार ६०० रुपयांचे सुपर इनॅमल वायरचे आठ रिळ प्रत्येकी २० किलो, एक लाख आठ हजाराचे जुने कॉपर वायरचे पांढर्‍या रंगाचे चार पोते, एक लाख ९९ हजार ९२० रूपयांचे सबमर्सीबल कॉपरचे वायर एकूण ३५७ किलो. १४ हजारांची रोख रक्कम, ११ हजार ५०० एक नाईट व्हीजन कंपनीचा सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे डीव्हीआर, असा एकूण चार लाख २२ हजार ८२० रूपयांचा माल चोरट्यांनी लंपास केला.

या साहित्यांचा समावेश होता. दरम्यान मागील सहा महिन्यात चोरट्यांनी व्यापार्‍यांना टार्गेट करत दुकाने फोडून लाखो रुपयांचा माल चोरून नेला. पोलिसांना चोरट्यांचा मागमूसच लागत नसल्याने चोर्‍याच्या घटनांत वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांतून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Visit – policenama.com 

Loading...
You might also like