शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उस्मानाबादकरांचे स्वप्न साकार होणार

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – बरीच वर्षे प्रलंबित असलेले उस्मानाबादचे वैद्यकीय महाविद्यालय होण्याबाबत उस्मानाबाद करांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आमदार सुजितसिंह ठाकुर यांच्या आग्रही मागणीला प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेच्या वेळी उस्मानाबाद कराना याबाबत आश्वासन दिले होते त्याचीच पूर्तता म्हणून याबाबत त्वरित हालचाली सुरू झाल्या आहेत त्याचाच एक भाग म्हणून या वैद्यकीय महाविद्यालयाच्या परीक्षणासाठी एक शासकीय पथक उस्मानाबादेत यासंबंधी उपलब्ध सोयीसुविधा व इतर बाबी तपासण्यासाठी उस्मानाबाद मध्ये आले होते.

या पथकात डॉ. दोड़े, डॉ. सेलूकर, डॉ. सुषमा जाधव, डॉ. नन्नवरे डॉ. सुनील पेठकर यांचा समावेश होता या पथकाने शहरातील सिविल हॉस्पिटल व इतर ठिकाणी भेटी देऊन त्याची पाहणी करून याबाबत सकारात्मकता दर्शविल्याचे कळते यावेळी भाजपा नेते राणाजगजितसिंह पाटील, प्रदेश कार्यकारणी सदस्य नितीन काळे भाजपा उपाध्यक्ष एडवोकेट नितीन भोसले तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी कोलते, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर गलांडे यांची उपस्थिती होती.
हे वैद्यकीय महाविद्यालय येत्या शैक्षणिक वर्षापासून चालू होईल अशी अपेक्षा उस्मानाबादकर व्यक्त करत आहेत.