अफगाणिस्तानात तालिबान्यांच्या ठिकाणांवर एअरस्ट्राइक, 100 हून अधिक दहशतवाद्यांचा ‘खात्मा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अफगाणिस्तानात तालिबानी अतिरेक्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले करण्यात आले आहेत. या हल्ल्यांमध्ये शंभराहून अधिक दहशतवादी ठार झाल्याचे समजते. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार शनिवारी रात्री लढाऊ विमानांकडून हल्ले करण्यात आले. या हल्ल्यात ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये तालिबानी कमांडर सरहदीही मारला गेला. यासह या दहशतवाद्यांचे दोन टँक व अनेक वाहनेही उद्ध्वस्त करण्यात आली आहे. या हल्ल्यात सुरक्षा दलाचा कोणताही सदस्य जखमी झाला नाही. दरम्यान, तालिबानच्या प्रवक्त्याने अद्याप हल्ल्याबद्दल प्रतिक्रिया दिली नाही.

कन्नर प्रांतातील छापा दारा जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलातील पाच जवान शहीद झाले. यात 28 तालिबानी अतिरेकी ठार झाले. येथे सुरक्षा दलाचे तीन सदस्य आणि सात दहशतवादी जखमी झाले आहेत. लढाऊ विमानांच्या मदतीने सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांवर हल्ला केला. हिंसाचाराच्या इतर घटनांमध्ये 25 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

ताज्या हल्ल्यात अफगाण सुरक्षा दलाने तालिबानचे सर्वात जास्त नुकसान केले आहे. दरम्यान अमेरिकेसह अनेक देश अफगाणिस्तानात कायमस्वरुपी शांततेसाठी सतत प्रयत्नशील असतात. देशांमध्येही तालिबान नेत्यांशी चर्चा सुरू आहे. यानंतरही हिंसाचारात कोणतीही कपात झालेली नाही. तालिबानबद्दल अमेरिकेची चिंताही वाढली आहे. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या करारानुसार 1 मे रोजी सैन्य परत येणार आहे. अमेरिकेने अद्याप या विषयावर कोणताही निर्णय घेतलेला नाही.

दरम्यान, अलीकडे तालिबानी अतिरेक्यांनी धमकी दिली होती की 1 मे पर्यंत अफगाणिस्तानातून परदेशी सैन्य मागे न घेतल्यास ते त्यांच्यावर पुन्हा हल्ले करण्यास सुरवात करतील. दहशतवादी संघटनेने म्हटले की, प्रदीर्घ युद्ध आणि विनाशाची जबाबदारी त्यांची असेल ज्यांनी त्याचे उल्लंघन केले. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी आधीच स्पष्ट केले की, 1 मे पर्यंत अफगाणिस्तानातून सैन्याची वापसी कठीण आहे.