‘या’ देशाचे पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबातील सर्वच सदस्यांना ‘कोरोना’ची लागण

येरेवान : वृत्त संस्था – आर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पाशिनियन आणि त्यांच्या कुटुंबाचे सर्व सदस्य कोरोनाच्या संसर्गाने बाधित आहेत. निकोल पाशिनियन यांनी सोमवारी एका फेसबुक पोस्टमध्ये ही माहिती दिली. यामध्ये म्हटले आहे की, त्यांच्यामध्ये आजाराची कोणतीही लक्षणे नव्हती. तरी सुद्धा त्यांनी लष्करी युनिट्सचा दौरा करण्यापूर्वी आपली तपासणी करण्याचा निर्णय घेतला. या तपासणीत त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. पंतप्रधानांनी सांगितले की, मी आता घरातून काम करणार आहे.

निकोल पाशिनियन यांनी म्हटले की, एका वेटरकडून मला संसर्ग झाला. हा वेटर एका बैठकीच्या वेळी हँडग्लव्हज न घालता माझ्यासाठी पाण्याचा ग्लास घेऊन आला होता. हा वेटर कोरोना बाधित असल्याचे आढळले आहे. आर्मेनियाची लोकसंख्या अवघी 30 लाख आहे, ज्यामध्ये कोरोनाचे आतापर्यंत नऊ हाजार पेक्षा जास्त रूग्ण आढळले आहेत. या देशात कोरोनामुळे 130 लोकांचा मृत्यूदेखील झाला आहे.

पीएम निकोल पाशिनियन यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचा रिपोर्टसुद्धा पॉझिटिव्ह आला आहे. आर्मेनियाने मार्चच्या मध्यावर कोरोना संकटामुळे आपत्तीची घोषणा केली होती. पंतप्रधान निकोल पाशिनियन यांनी मागच्या आठवड्यात म्हटले होते की, देशात कोरोनामुळे स्थिती बिघडत चालली आहे. यापूर्वी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना सुद्धा कोरोनाचा संसर्ग झाला होता.

जगभरात कोरोना व्हायरसची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. जॉन्स हापकिन्स युनिव्हर्सिटीकडून मिळालेल्या आकड्यांनुसार, जगभरात कोरोना संसर्गाची एकुण 61,48,167 प्रकरणे समोर आली आहेत. तर 3,71,510 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 26,19,630 रूग्ण बरे सुद्धा झाले आहेत. अमेरिका, ब्राझील आणि रशियामध्ये कोरोना व्हायरसची सर्वात जास्त प्रकरणे समोर आली आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like