बलुची लिबरेशन टायगरने गॅस पाईप लाईन उडविली

डेरा बुगटी : वृत्तसंस्था – बलुची लिबरेशन आर्मीने डेरा बुगटी भागातील गॅस पाईप लाईन स्फोटकांनी उडवून दिली आहे. या घटनेत चार जणांचा मृत्यु झाला आहे. या गॅस पाईपलाईन उडवून दिल्याची जबाबदारी बलुची लिबरेशन टायगरने घेतली आहे. पाकिस्तानपासून वेगळे बलुचिस्तान राष्ट्र निर्माण करण्यासाठी बलुची लिबरेशनचा हा लढा चालू आहे.

बलुचीस्तानमध्ये निर्माण होणारा हा नॅचरल गॅस पंजाब प्रांतात पाठविण्यात येतो. एका बाजूला बलुचीमधील नागरिकांना गॅस उपलब्ध नसताना हा गॅस इतरांना पाठविण्यात येत असल्याने ही गॅस पाईपलाईन उडवून दिली आहे.  इस्लामाबादकडून बलुचीस्तानमधील गॅस, पाणी आणि इतर नैसर्गिक साधनसामुग्रीची लुट केली जात आहे.

या साधनसामुग्रीचा येथे उपयोग न करता दुसऱ्या प्रांताच्या विकासासाठी केला जात असून बलुचीस्तान मात्र भकास ठेवला जात असल्याचा या संघटनेचा दावा आहे.