‘कोरोना’मुळं जर्मनीत दिवाळखोरीत निघताहेत कंपन्या, सर्वप्रथम 10 मजली ‘पाशा’वर दिसला परिणाम

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे जगभरात अनेक गोष्टींवर प्रतिबंध लावण्यात आले आहेत. कोरोनामुळे अनेक उद्योगांवर प्रतिकुल परिणाम झाला आहे. काही उद्योग तर बंद पडले तर काही पूर्णपणे कोलमडले आहेत. यापैकीच एक आहे जर्मनीच्या कोलोन शहरातील वेश्यालय पाशा. कोरोनामुळे पाशाचा सुद्धा व्यवहार ठप्प झाला आहे. याचा परिणाम असा झाला आहे की, युरोपातील अनेक मोठ्या रेड लाइट एरियांनी आपल्याला दिवाळखोर घोषित केले आहे.

एजन्सीनुसार पाशाने आपला सर्व पैसा मागील महिन्यांत हे 10 मजली सेंटर सुरू ठेवण्यासाठी आणि आपल्या स्टाफला पैसे देण्यात खर्च केला आहे. कोलोन शहर जर्मन राज्य नॉर्थ राईन वेस्टफेलियामध्ये आहे आणि कोविड-19 व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी राज्याने पाच महिन्यांपूर्वी येथे देह व्यापारावर बॅन लावला होता. एका संघटनेने इशारा दिला होता की, अशाप्रकारे ब्रॉथेल बंद केल्याने हे काम लपून केले जाईल, ज्यामध्ये महिलांचे शोषण होण्याची जास्त शक्यता आहे.

दिवाळखोरीची लाट
पाशाचे संचालक अरमीन लोबशाइड यांनी एजन्सीला सांगितले की, आता आम्ही शेवटाकडे पोहचलो आहोत. मागील पाच महिन्यांच्या दरम्यान स्टाफ जसे की, मुली, कुक, मसाज देणारे आणि इमारतीची देखरेख करणारे, यांच्यावर शिल्लक असलेला पैसा संपवला आहे. कोरोनापूर्वीच्या काळात या सेंटरमधून एकावेळी 120 लोक फ्रिलान्स तत्वावर काम करत होते.

लॉकडाऊनमुळे झाले नुकसान, झाले दिवाळखोर
लोबशाईडने जर्मन प्रशासनावर टिका करताना म्हटले की, राज्याने कधी स्पष्ट सांगितले नाही की, 5 महिन्यांपूवी लागू केलेला प्रतिबंध कधीपर्यंत चालणार आहे. आम्ही अशाप्रकारे योजना बनवू शकत नाही. आम्ही बँकांकडून मदत घेऊन दिवाळखोर होण्यापासून वाचू शकलो असतो, जर आम्हाला सांगितले असते की, पुढील वर्षाच्या सुरूवातीपर्यंत सर्व खुले केले जाऊ शकते. पाशाच्या संचालकांनी हे सुद्धा सांगितले की, सर्वांना माहिती आहे की, पैसे देऊन अशाप्रकारच्या सेवा घेण्याचे काम बॅननंतरही सुरूच होते.

अनेक कंपन्या स्वताला बँकरप्ट घोषित करतील
पाशाच्या दिवाळखोरीच्या दरम्यान जर्मनीच्या क्रेडिटरिफॉर्म नावाच्या एका क्रेडिट ब्यूरोने इशारा दिला आहे की, येत्या काळात कोरोना महामारीमुळे अनेक कंपन्या स्वताला बॅकरप्ट घोषित करू शकतात. क्रेडिटरिफॉर्मचे सीईओ फोल्कर उलब्रिष्टचे म्हणणे आहे की, चौथ्या तिमाहीत अशा अर्जांच्या संख्येत मोठी वाढ होईल.

उलब्रिष्टचे म्हणणे आहे की, खेळ, मनोरंजन आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम करणार्‍या कंपन्या आणि विशेषकरून छोटे व्यावसायिक जास्त दबावाखाली आहेत. जर्मनी सध्या जागतिक महायुद्धाच्या समाप्तीनंतरच्या आपल्या सर्वात जास्त वाईट आर्थिक काळातून जात आहे आणि ऐतिहासिक मंदीच्या जवळ जात आहे.