Coronavirus Updates : रक्तापासून 20 मिनिटांत केली जाऊ शकते ‘कोरोना’ची टेस्ट, संशोधकांनी शोधली नवीन पद्धत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – संपूर्ण जग सध्या कोरोना विषाणूशी झुंज देत आहे. या धोकादायक विषाणूचा तोडगा शोधण्याबरोबरच, वैज्ञानिक समुदाय तपासणी प्रक्रियेला वेग देण्यासाठी नवीन पद्धती विकसित करण्यावरही कार्यरत आहे. याच पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियन संशोधकांनी नवीन रक्त चाचणी आणली आहे. त्यांचा असा दावा आहे की, ही तपासणी केवळ 20 मिनिटांत कोरोना पॉझिटिव्ह प्रकरणे ओळखू शकते.

ऑस्ट्रेलियाच्या मोनाश विद्यापीठातील संशोधकांनी ही साधी रक्त चाचणी विकसित केली आहे. यामध्ये, कोरोनाला प्रतिसाद म्हणून तयार केलेल्या अँटीबॉडीज ओळखल्या जातात. या चाचणीसाठी रक्ताच्या नमुन्यातून 25 मायक्रोलिटर प्लाझ्मा आवश्यक आहेत. हे संसर्ग सहज ओळखू शकते.

विद्यापीठातील रसायन अभियांत्रिकीचे वरिष्ठ व्याख्याते सायमन कॅरी म्हणाले, ‘नवीन चाचणीमुळे रुग्णाच्या प्लाझ्मामधील अँन्टीबॉडीज ओळखतात. चाचणीची ही सोपी पद्धत चाचणीला वेगवान करू शकते. ही चाचणी कोणत्याही प्रयोगशाळेत करता येते.

सध्याची स्वॅब टेस्ट कोरोना इन्फेक्शन ओळखण्यासाठी वापरली जाते. तर अँन्टीबॉडी चाचणीद्वारे एखाद्या व्यक्तीस यापूर्वीच संसर्ग झाला आहे की नाही याचा तपास केला जातो. एसीएस सेन्सर या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात संशोधकांनी केलेल्या नव्या तपासणीचे संपूर्ण नैदानिक ​​मूल्यांकन करण्याची गरज यावर जोर देण्यात आला आहे. यासाठी सरकारकडून पाठिंबा मागितला आहे.