Coronavirus : ‘कोरोना’ची अफवा ! थायलंडच्या कारागृहात कैद्यांचा ‘राडा’,अनेकांचे जेलमधून ‘पलायन’

बँकॉक : वृत्तसंस्था –  जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. जगभरातील निम्याहून अधिक देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग झाला आहे. अशातच थायलंडमधील कारागृहात कोरोना विषाणू पसरल्याची अफवा पसरल्याने कैद्यांनी एकच गोंधळ घालत राडा केला. कारागृहा कोरोनाचा फैलाव झाल्याचे समजात कारगृहातील कैदी संतप्त झाले. त्यांनी कारागृहातील फर्नीचर आणि खिडक्यांची तोडफोड केली. तर काही ठिकाणी आग लागवण्यात आली. याच दरम्यान काही कैदी कारागृहातून पळून जाण्यात यशस्वी झाले. थायलंडमध्ये आतापर्यंत कोरोनामुळे सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1388 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

थायलंडच्या न्याय मंत्रालयाने दिलेल्या वृत्तानुसार, दोन हजार गुन्हेगार हिंसाचाराच्या वेळी बुराराम कारागृहात होते. या ठिकाणाहून काही कैदी पळून गेले. पळून गेलेल्या कैद्यांपैकी सात कैद्यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान स्थानिक मीडियाने इशान्यकडील राज्यातील एक फुटेज प्रसिद्ध केले आहे. यामध्ये आकाशात धुराचे लोट दिसत आहेत.

सुधार विभागाचे महासंचालक नरत सवेतना यांनी सांगितले, वास्तविक काही कैदी पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. आणि त्यामुळे कारागृहात एकच गोंधळ उडाला. या कैद्यांनी कारागृहातील फर्निचर जाळले तर खिडक्यांची तोडफोड केली. तर मेजर जनरल अक्रदेझ पिमणसरी म्हणाले की, कैद्यांशी बोलण्यासाठी आरोग्य आधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. कारागृहात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याची अफवा पसरल्याने काही कैदी घाबरले होते. सध्या या ठिकाणची परिस्थिती नियंत्रणात आहे. सर्व कैदी सुरक्षित आहेत आणि तुरुंगात कोरोना विषाणूची लागण कोणालाही झालेली नसल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, राजधानी बोगोटामध्ये मागील रविवारी कोरोनाच्या विषाणू पसरल्याची अशीच अफवा पसरली होती. यामुळे झालेल्या गोंधळात 23 कैद्यांचा मृत्यू झाला होता.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like