‘थायरॉईड’ रोगासही कारणीभूत ठरू शकतो COVID-19 , जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  कोरोना विषाणूच्या जागतिक प्रसारामुळे इतर गंभीर आरोग्य समस्यांचा धोका वाढला आहे. आता एका नवीन अभ्यासात असे आढळले आहे की, या धोकादायक विषाणूमुळे सबक्यूट थायरॉईडायटीस नावाच्या दाहक थायरॉईड रोगाचा धोका वाढू शकतो.

थायरॉईड ग्रंथीत सूज

जर्नल ऑफ क्लिनिकल एंडोक्रिनोलॉजी अँड मेटाबोलिझममध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, सबक्यूट थायरॉईडायटीसमुळे थायरॉईड ग्रंथीला सूज येते. यामुळे घसा खवखवतो. ही समस्या सहसा श्वसन प्रणालीच्या वरच्या भागात संक्रमणाने सुरू होते. संशोधकांनी हा रोग व्हायरल इन्फेक्शन किंवा व्हायरलनंतरची प्रक्षोभक प्रतिक्रियेमुळे होऊ शकतो असे म्हटले आहे. हा रोग अनेक विषाणूंशी संबंधित आहे.

सार्स -कोवी -2 विषाणूमुळे श्वसनाच्या गंभीर समस्या

ते म्हणाले की, कोविड – 19 ला कारणीभूत सार्स-कोवी – 2 विषाणू यावेळी महामारी म्हणून उदयास आला आहे. यामुळे श्वसनाच्या गंभीर समस्या उद्भवत आहेत. हे इतर अवयवांशी संबंधित समस्यांमध्ये देखील सामील असू शकते. इटलीच्या यूनिवर्सिटी हॉस्पिटल ऑफ पीसाचे संशोधक फ्रान्सिस्को लाट्रोफा म्हणाले, ‘ सार्स -कोवी -2 विषाणूच्या संसर्गामुळे सबस्यूट थायरॉईडिसची पहिली घटना आढळली आहे. या विषाणूशी संबंधित इतर समस्यांबाबत डॉक्टरांनी जागरुक राहण्याची गरज आहे. अलिकडच्या अभ्यासात असे आढळले आहे की, कोरोना विषाणूमुळे हृदयविकाराच्या झटक्यासह हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो. रक्त गोठण्याचा धोका देखील आढळला आहे. हे देखील कळले आहे की, कोरोना पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर (पीटीएसडी) आणि डेलीरियम सारख्या मानसिक समस्यांना देखील कारणीभूत ठरू शकते.