चीनविरोधात मोर्चेबांधणीसाठी युरोपीय संघाची तयारी, युरोप आणि अमेरिकेत होणार चर्चा

ब्रुसेल्स : वृत्तसंस्था – युरोपीय संघाच्या प्रमुखांनी युरोप आणि अमेरिकेमध्ये चर्चेसाठी आवाहन केले आहे, ज्याचा उद्देश चीनविरूद्ध एक संपूर्ण ट्रान्साटलांटिक आघाडी बनवणे आहे. बँकॉक पोस्टनुसार, युरोपीय संघाच्या परराष्ट्र प्रकरणांचे वरिष्ठ प्रतिनिधी जोसेप बोरेल यांनी म्हटले की, दोन्ही पक्षांना आमची मुल्ये आणि आमच्या रूचीचे रक्षण करण्यासाठी एक कारण तयार केले पाहिजे.

बोरेल यांनी सोमवारी 27 युरोपीय संघाचे परराष्ट्र मंत्री आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पिओ यांच्यासोबत व्हिडिओ संवादादरम्यान हे वक्तव्य केले. त्यांनी म्हटले की, आम्हाला चीनसाठी आणखी मजबूत रणनिती करण्याची गरज आहे, ज्यामध्ये अन्य लोकशाही आशियासह चांगल्या संबंधाची सुद्धा गरज आहे. बोरेल म्हणाले, त्यांनी चीनवर केंद्रीत ‘विशिष्ट द्विपक्षीय चर्चा‘ सुरू करण्याचा सल्ला दिला आहे. युरोपीय संघ आणि अमेरिकेसाठी या द्विपक्षीय चर्चेत कार्य आणि महत्वाकांक्षा यांच्याशी संबंधीत आव्हाने आहेत.

ते म्हणाले, ‘आमच्यासाठी, चिंता व्यक्त करण्यासाठी अमेरिका असणे महत्वपूर्ण आहे‘ बोरेल यांच्या सल्ल्यावर अमेरिकेने अजूनपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

युरोपीय देशांमध्ये सुरू होणार दळणवळण
कोरोना महामारीचे प्रमाण कमी झाल्यानंतर युरोपीय महाद्वीपमध्ये तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीनंतर दळणवळण सुरू करण्याची तयारी चालली आहे. युरोपीय संघाने (ईयू) काही कालावधीपूर्वी घोषणा केली होती की, या महाद्वीपात अनावश्यक प्रवासावर लावलेली बंदी 1 जुलैपासून शिथिल करण्याची योजना आहे. योजनेंतर्गत परदेशातील विद्यार्थी, युरोपी नागरिक नसलेले लोक आणि कामानिमित्त येणार्‍यांनाही बंदीतून दिलासा दिला जाईल. कोरोनामुळे सर्वात जास्त प्रभावित झालेल्या युरोपीय देशांमध्ये इटली, स्पेन, ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनीचा सहभाग आहे. आता या देशांमध्ये नवीन प्रकरणे अतिशय कमी दिसून येत आहेत. सध्या जगभरात कोरोना संक्रमितांचा आकडा 79 लाखांच्या पुढे गेला आहे.