11 दिवसानंतर दुसर्‍यांसाठी धोकादायक नाही बनू शकत कोणताही ‘कोरोना’चा रूग्ण, संशोधनात समोर आली माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सिंगापूरमधील राष्ट्रीय संसर्ग रोग केंद्रा (एनसीआयडी) ने केलेल्या अभ्यासात दावा केला गेला आहे की, ११ दिवसांनंतर बहुतेक रूग्णांपासून इतरांमध्ये हा संसर्ग पसरण्याची शक्यता कमीच होते. रुग्णालयातील ७३ कोरोना संक्रमित रुग्णांवर संशोधकांनी हे संशोधन केले आहे. एका वृत्तसंस्थेनुसार, संशोधनात असे दिसून आले आहे की लक्षण उद्भवल्यानंतर सात दिवसांपर्यंत रुग्णामध्ये विषाणू वाढण्याची आणि हवेमध्ये पसरण्याची शक्यता अधिक असते. पण, आठव्या ते दहाव्या दिवशी हे कमकुवत होऊ लागते आणि ११ व्या दिवसापासून ते पूर्णपणे नष्ट होऊ लागते.

सिंगापूरमधील नियमांनुसार, संक्रमित रुग्णाला दोन तासांच्या चाचणीनंतर २४ तासांच्या कालावधीत स्वॅब चाचणी निगेटिव्ह आल्यास सोडण्यात येते. एनसीआयडीच्या मते, जर स्वॅब टेस्टचा अहवाल पॉजिटीव्ह असेल तर याचा अर्थ असा नाही की संक्रमित व्यक्ती इतरांमध्ये व्हायरस पसरवू शकते. खरतर स्वॅब चाचणी सार्स-कोव्ह-२ च्या जीनोमची उपस्थिती ओळखते, पण संक्रमित रूग्णात विषाणू किती आहे याची माहिती मिळू शकत नाही. तसेच यातून हे देखील समजत नाही की, जर संक्रमित व्यक्तीमध्ये या विषाणूचे घटक असतील तर त्यांच्यात पुढे पसरवण्याची क्षमता असते की नसते.

एनसीआयडीचे संचालक लिओ यी म्हणतात की, संसर्ग होण्याच्या ११ दिवसांनंतर रुग्ण इतरांसाठी धोकादायक नसतो. असे मानले जाते की, या संशोधनानंतर सिंगापूरमधील कोरोना संक्रमितां संबंधीचे नियम बदलले जाऊ शकतात. या संशोधनात सामील असलेले भारतीय वंशाचे डॉक्टर अशोक कुरूप यांच्या मते, या संशोधनाचे निकाल अत्यंत अचूक आहेत. त्यांना कोविड-१९ ने ग्रस्त असलेल्या रूग्णांवर लागू करणे सुरक्षित आहे, जरी ते गंभीर परिस्तिथीत संक्रमित असतील. मात्र, गंभीर रूग्णांना दीर्घ काळापर्यंत वैद्यकीय काळजी घेणे आवश्यक असते. म्हणूनच, त्यांना वेगळे ठेवण्याची आवश्यकता नसताना ११ दिवसानंतर सोडणे योग्य नाही, कारण जरी ते इतरांमध्ये संसर्ग पसरवत नसले तरीही त्यांच्या स्वतःच्या जीवाला धोका असू शकतो. यापूर्वी असेच एक संशोधन जर्मनीमध्येही केले गेले होते. येथील कोरोना संक्रमित नऊ रुग्णांवर केलेल्या संशोधनातही असेच काही आढळले होते. संशोधनात असे आढळले होते की, संसर्ग होण्याच्या पहिल्या ७ दिवसात रुग्णाच्या घशात आणि फुफ्फुसांमध्ये व्हायरसची संख्या झपाट्याने वाढताना दिसली, पण नंतर त्याचा प्रसार कमी झाला आणि ११ दिवसांनी संपला.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like