Coronavirus Lockdown : नेपाळने आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर 30 एप्रिलपर्यंत बंदी वाढविली

काठमांडू : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे नेपाळने 30 एप्रिलपर्यंत आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी वाढविली आहे. तर देशांतर्गत उड्डाणांवर 15 एप्रिलपर्यंत बंदी कायम राहणार आहे. यापूर्वी नेपाळने 7 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला होता. त्यानंतर आता लॉकडाऊनचा कालावधी 15 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला आहे. बहुतेक देशांनी परदेशी नागरिकांना आपल्या देशात येण्यास बंदी घातली आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि दोन्ही देशांच्या सीमेवरची परिस्थिती सामान्य ठेवण्यासाठी 3 एप्रिल रोजी भारत आणि नेपाळमध्ये गोरखपूरमध्ये एक बैठक झाली होती. या बैठकीत काही सेवांवर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली होती. या बैठकीत सीमेवर योग्यत्या सेवा देण्यावर भर देण्यात आला. तसेच तबलिगी जमातीच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांना क्वारंटाईन करण्याबाबत देखील चर्चा झाली. तसेच दोन्ही देशांतील लोक वैद्यकीय उपचारांसाठी एकमेकांच्या देशात जाऊ शकतात याबाबतही चर्चा झाली.
क्वारंटाईनमधील दोन्ही देशांच्या नागरिकांना अडचणी नाहीत.

3 एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत सीमेला लागून असलेले लोक औषध आणि वैद्यकीय उपचारांसाठी एकमेकांच्या देशात जाऊ शकतात यावर निर्णय घेण्यात आला. अशा परिस्थितीमध्ये सीमेवर कोणतीही आपत्कालीन सेवा थांबवली जाणार नाही. तसेच या बैठकीत दोन्ही देशांमध्ये अकडलेल्या नेपाळ आणि भारतीय लोकांबाबत चर्चा झाली.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like