जर्मनीमध्ये काँग्रेसच्या आंदोलनात फडकवला पाकिस्तानी झेंडा, कृषी कायद्याला केला जात होता विरोध

बर्लिन : वृत्तसंस्था – भारतात लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात जर्मनीच्या बर्लिनमध्ये काँग्रेसने एका आंदोलनात पाकिस्तानी झेंडा फडकावल्याचा दावा एका भाजपा नेत्याने केला आहे. पाकिस्तानी झेंडा फडकावणारा काँग्रेस कार्यालयाचा एक पदधिकारी असल्याचे सांगितले जात आहे. झेंड्यासोबत काँग्रेसच्या या पदाधिकार्‍याचा फोटोसुद्धा ट्विटरवर शेयर करण्यात आला आहे.

सुरेश यांनी ट्विटरवर शेयर केला आंदोलनाचा फोटो
भाजपा नेते सुरेश नाकहुआ यांनी ट्विटरवर फोटोसह पूर्ण माहिती दिली आहे. त्यांच्यानुसार, इंडियन ओव्हरसीज काँग्रेसने बर्लिनमध्ये तीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलन आयोजित केले होते. यामध्ये पाकिस्तानी झेंडे फडकवण्यात आले. सुरेश यांनी आपल्या ट्विटर हँडलवर आंदोलनाचा फोटो सुद्धा शेयर केला आहे आणि म्हटले आहे की, एक युवक काँग्रेस कार्यकर्ता चरन कुमार आहे, दूसरा कार्यालयाचा पदाधिकारी राज शर्मा आहे. यांच्या हातात पाकिस्तानी झेंडा होता.

जर्मनीच्या काँग्रेस अध्यक्षांनी म्हटले आरोप खोटा
दरम्यान, इंडियन ओव्हरसीज काँग्रेस जर्मनीचे अध्यक्ष प्रमोद कुमार यांनी एक वक्तव्य जारी करून भाजपा नेत्याचे हे वक्तव्य खोटे असल्याचे म्हटले आहे. वक्तव्यात म्हटले की, राज शर्मा तरूण नसून 65 वर्षांचे ज्येष्ठ आहेत. आयओसीने असा कोणताही कार्यक्रम आयोजित केलेला नाही.