रक्तातील व्हिटॅमीनची पातळी आरोग्याच्या धोक्याबाबत देते संकेत : संशोधन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वैज्ञानिकांच्या मते रक्तातील व्हिटॅमिन ‘डी’चं प्रमाण भविष्यातील होणाऱ्या आजारांचे संकेत देतं. व्हिटॅमिन डी चे प्रमाण रक्तात कमी असेल तर अनेक आजार होण्याचा धोका असतो. त्यात कॅन्सर सारख्या रोगांचा समावेश आहे. या संबंधीचा अहवाल मंगळवारी आयोजित एका ई-ईसीसी 2020 ऑनलाईन संमेलनात सादर करण्यात आला.

शरीरात व्हिटॅमिन डी चे अनेक मेटाबोलाईट्स असतात, याचा उपयोग व्हिटॅमिन डी चं प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी केलं जातं. प्रोहार्मोन आणि डीहायड्रोक्सि व्हिटॅमिन डी मध्ये परिवर्तित होते. त्यामुळं आपल्या शरीरात व्हिटॅमिन डी सक्रिय असल्याचं मानलं जातं.

रक्तातील व्हिटॅमिन डी मेटाबोलाईट्सच्या 99% अधिक प्रमाणात प्रोटीन आहे आणि व्हिटॅमिन डी चा एक छोटासा भाग जैविक रुपात सक्रिय होण्यास स्वतंत्र आहे. असं मानलं जातं की रक्तात असणारे व्हिटॅमिन डी चे प्रमाण आरोग्याच्या धोक्याबद्दल संकेत देते.

बेल्जीयमच्या युनिव्हर्सिटी हॉस्पिटलच्या ल्युवेन सोबतच्या संशोधकांनी 40 ते 79 वयाच्या 1970 पुरुषांची माहिती गोळा करून व्हिटॅमिन डी चे कार्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

या शोधात व्हिटॅमिन डी च्या एकूण आणि स्वतंत्र मेटाबोलाईट्स स्तराची तुलना त्यांच्या सध्याच्या आरोग्याशी केली गेली. त्यातून अशी माहिती समोर आली की व्हिटॅमिन डी ची शरीरातील कमतरता आरोग्याच्या नाकारात्मक प्रभावाशी संबंधित आहे आणि भविष्यात होणाऱ्या आजारांचा संकेत देते.