हुकूमशहा किम जोंग उनच्या ‘त्या’ विधानावर दक्षिण कोरिया अलर्ट , सुरक्षेसाठी बनविली विशेष रणनीती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरियन द्वीपकल्पात पुन्हा एकदा उत्तर आणि दक्षिण कोरिया दरम्यान अंतर वाढताना दिसत आहे. याचे मुख्य कारण उत्तर कोरियाच्या प्रमुखांचे विधान आहे. ज्यात त्यांनी अण्वस्त्रांचा साठा वाढवण्याविषयी बोलले आहे. किमच्या या विधानावरून दक्षिण कोरियानेही आपल्या सुरक्षेसाठी सैन्य क्षमता वाढविण्यासंदर्भात बोलले आहे. दक्षिण कोरियाने उत्तर कोरियाकडून प्रक्षेपित करण्यात आलेल्या मध्यम-श्रेणी क्षेपणास्त्रांचा बचाव करण्याची आपली लष्करी क्षमता आणखी वाढविणार असल्याचे म्हटले आहे.

माहितीनुसार, दक्षिण कोरियाने यावर्षी सबमरीनमधून लॉन्च करण्यात येणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची (एसएलबीएम) अंडरवॉटर चाचणी घेईल. या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचे नाव Hyunmoo-2B आहे, ज्याची रेंज सुमारे 500 किमी आहे. संरक्षण अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हे क्षेपणास्त्र 3000 टन क्लासच्या सबमरीनने लाँच केले जाऊ शकते. गेल्या वर्षीच दक्षिण कोरियाने जमिनीपासून क्षेपणास्त्राची चाचणी केली. दरम्यान, यासाठी कोणत्या प्रकारचे प्लँटफॉर्म वापरणार हे दक्षिण कोरियाने अद्याप स्पष्ट केले नाही. याबाबत विचारले असता संरक्षण अधिका्यांनी कोणतीही माहिती देण्यास नकार दिला आहे. दक्षिण कोरियाला संपूर्ण द्वीपकल्पात शांतता हवी आहे असे त्यांचे म्हणणे आहे. याशिवाय आपली सुरक्षा ही पहिली प्राथमिकता आहे. यासाठी ते सतत प्रयत्नशील राहतील.

दरम्यान, दक्षिण कोरियाने काही काळापासून बचावात्मक तयारी तीव्र करण्यास सुरूवात केली आहे. नुकताच उत्तर कोरियामधील सत्ताधारी पक्षाच्या कॉंग्रेस बैठकीच्या अखेरच्या दिवशी राज्यप्रमुख किम जोंग-उन यांनी ज्या प्रकारच्या गोष्टी बोलल्या त्या कारणामुळे यात वेग वाढल्याचा दिसत आहे. किम यांनी बैठकीच्या शेवटच्या दिवशी स्पष्ट केले की, अमेरिकेबरोबर कोणताही करार न झाल्यानंतर आता ते पुन्हा आपल्या अण्वस्त्रांची ताकद वाढवण्यात कुठलीही कसर सोडणार नाहीत. दक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, ते सध्या उत्तर कोरिया कोणत्या प्रकारची वृत्ती घेतात याविषयी माहिती गोळा करीत आहेत.

प्रवक्त्याने असेही म्हटले की, दक्षिण कोरियाकडे उत्तर कोरियाच्या मध्यम-श्रेणी क्षेपणास्त्रांविरूद्ध संरक्षण करण्याची क्षमता आहे. विशेष म्हणजे उत्तर कोरियामध्ये गेल्या पाच वर्षांत प्रथमच कॉंग्रेसची बैठक बोलविण्यात आली. या बैठकीत किम यांनी अधिकाऱ्यांना उच्चशक्ती असलेल्या लहान, हलकी अण्वस्त्रे बनविण्याचे आदेश दिले आहेत. या व्यतिरिक्त त्यांनी अणुऊर्जा पाणबुडीच्या विकासास गती देण्याविषयी बोलले आहे. किम यांनी म्हटले की, अशी क्षेपणास्त्र क्षमता विकसित केली गेली पाहिजे जी 15,000 किमी अंतरावर अमेरिकेच्या मुख्य भूमीला ठोकेल. विशेष म्हणजे उत्तर कोरियाप्रमुखांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमवेत तीन समिट केले होते. प्रत्येक वेळी हे अनिश्चित राहिले. आता जेव्हा अमेरिकेत सत्ता हस्तांतरित होणार आहे, किम यांच्या वक्तव्याचा आक्रमकपणा पुन्हा एकदा कोरियन द्वीपकल्पात धोका निर्माण करीत आहे.