इंग्लंडचा दिग्गज क्लब ‘मॅनचेस्टर सिटी’वर UEFA नं 2 वर्षाची घातली ‘बंदी’

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – इंग्लंडने दिग्गज क्लब मँचेस्टर सिटीवर चॅम्पियन लीगमधून युईएफए द्वारे पुढील दोन सिझनसाठी बंदी घालण्यात आली आहे. एवढेच नाही तर यूरोपीयन फुटबॉल गवर्निंग बॉडीची दिशाभूल केल्यामुळे आणि आर्थिक प्रकरणांमध्ये खेळाचे नियम तोडल्याचा आरोप लावण्यात आला आहे. ज्यामुळे तीस मिलियन इतका दंड देखील भरावा लागला होता.

क्लबकडून सांगण्यात आले की, मँचेस्टर सिटी यामुळे नाराज आहे परंतु आश्यर्यचकित नाही. 2018 मधेच यूईएफएचे प्रमुख तपासणी करणाऱ्यांनी या प्रकरणी मँचेस्टर सिटीला इशारा दिला होता. त्यानंतर तपासणी सुरु झाली.

त्यानंतर वारंवार यूईएफएच्या प्रक्रियेमध्ये अडचणी निर्माण होत होत्या. ज्याचा अर्थ असा होता की यूईएफए जो निकाल देणार होते तो संशयास्पद होता. क्लबने यूईएफएला आपली तक्रार दिली होती.

यूईएफए द्वारे हे प्रकरण सुरु करण्यात आले होते आणि त्यांनीच याचा परिणाम दिला होता. अशामध्ये आता क्लबला लवकरात लवकर निष्पक्षतेने निर्णय घ्यावा लागणार आहे. ज्यामध्ये क्लब लवकरात लवकर कारवाई करायला सुरुवात करेल.

You might also like