सांगलीत परप्रांतीय कामगाराने 84 लाखांचे सोने लांबवले

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील एका सराफी दुकानात काम करत असलेल्या परप्रांतीय कामगाराने 2300 ग्रॅम वजनाचे तब्बल ८४ लाख रुपयांचे सोनेे लांबवले. गुरुवारी हा प्रकार उघडकीस आला. गुलाम शेख (रा. पश्चिम बंगाल) असे चोरट्या कामगाराचे नाव आहे. याबाबत सांगली शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

या प्रकरणी सराफ संतोष नार्वेकर यांनी फिर्याद दिली आहे. गुलाम गेल्या ७ वर्षांपासून नार्वेकर यांच्या दुकानांत काम करीत होता. 7 वर्षांपासून तो प्रामाणिकपणे काम करत असल्याने नार्वेकर यांचा त्याच्यावर विश्वास बसला होता. त्यामुळे नार्वेकर यांनी दुकानाच्या किल्ल्या त्याच्याकडे दिल्या होत्या. १६ सप्टेंबरच्या रात्री गुलाम याने त्याच्याकडे असलेल्या किल्ल्यांचा वापर करून दुकान उघडून दुकानात ठेवलेल्या चोख सोन्याच्या २३०० ग्रॅम वजनाच्या ७ लगदी चोरून नेल्या. दुकानातील सोन्याच्या लगदी आणि कामगार गायब झाल्याचे लक्षात येताच संतोष नार्वेकर यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली आहे.

Visit – policenama.com 

You might also like