भाजपचे CM ठाकरे यांना आवाहन, म्हणाले – ‘लशीसाठी इतर राज्यांनी चेक दिले पण महाराष्ट्राने नाही; BMC कडे अफाट पैसा तो खर्चून लस विकत घ्या’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण मोफत करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. यासाठी आवश्यक असलेले लसींचे डोस विकत घेण्यासाठी राज्य सरकार एक रकमी चेक देण्यासाठी तयार असल्याचेही मुख्यमंत्री उध्द्व ठाकरेंनी म्हटलं होते. याच मुद्द्यावरुन आता भाजपने ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. 18 वर्षावरील व्यक्तींना मोफत देणार असे राज्य सरकारने सांगितलं होते. पण प्रत्यक्षात राज्य सरकारने काय केले ? इतर राज्यांनी लस उत्पादक कंपन्यांना चेक दिले आहेत. मात्र ठाकरे सरकारने चेक दिला नाही. आमचं मुख्यमंत्र्यांना आवाहन आहे की, बीएमसीकडे 50 ते 60 हजार कोटींच्या ठेवी आहेत. त्यामुळे 150 कोटी रूपये देऊन लस विकत घ्याव्यात, असे दरेकर यांनी म्हटले आहे.

केंद्राकडे बोट दाखवून स्वत:चे अपयश झाकू नये. राजस्थान आणि गुजरात पेक्षाही जास्त लस महाराष्ट्राला मिळाल्या आहेत. ललस देण्याचे राज्याने काय नियोजन केले आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. सांगली आणि सातारा जिल्ह्यांना सहा ते साडेसहा लाख लस मिळाल्या. त्याचवेळी सिंधूदूर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्याना दीड ते 2 लाखांपर्यंत मिळाल्यात. 4 लाख 53 हजार डोस आज राज्यात आहेत. तरीही लस उपलब्ध नाही, अशी ओरड राज्य सरकार करत आहे. केंद्र सरकार राज्य सरकारला भरभरून देत असतानाही केंद्र सरकारकडून काहीच मिळत नाही हे बोलणे चुकीचे आहे. शेतकऱ्यांना बांधावर जाऊन जसे सांगितलं होत. तसे आता मोफत लसीकरणाबाबत होणार नाही ना? जनतेला लवकर मोफत लस द्यावी अशी मागणी आम्ही करतोय, असेही दरेकर यांनी म्हटले आहे.