भारत-चीनमध्ये भविष्यामध्ये देखील ‘खुनी’ संघर्ष होण्याचा धोका, लवकर निवळणार नाही दोघांमधील तणाव

हाँगकाँग : वृत्तसंस्था – पूर्व लडाखमध्ये मागील एक महिन्यापासून भारत आणि चीनमध्ये झालेल्या हिंसक संघर्षातून सावरणार्‍या भारताला समजण्याबाबतच्या ड्रॅगनच्या आकलनावर प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच दोन्ही आण्विक शक्तींमध्ये हिंसक संघर्षाचा धोकासुद्धा वाढला आहे. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टमध्ये प्रकाशित एका विश्लेषणात याबाबत उल्लेख करण्यात आला आहे.

माजी कूटनिती तज्ज्ञ शी जियांगताओ यांनी या लेखात म्हटले आहे की, चीन अगोदरच अमेरिकेसाबत शीत युद्धात अडकलेला होता, तेव्हाच जूनमध्ये भारतासोबत चीनचा प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर हिंसक संघर्ष झाला. मागील 50 वर्षांत असे प्रथमच झाले आहे. मात्र, दोन्ही देश वाद टाळण्याची इच्छा आणि सहमती दर्शवत आहेत, तरीसुद्धा तणाव लवकर कमी होण्याची आशा कमीच आहे. गलवान खोर्‍यात झालेल्या हिंसक संघर्षानंतरच एलएसीच्या दोन्ही बाजूला सैनिकांची संख्या वाढवली जात आहे आणि मोठ्या संख्येने शस्त्र पोहचवली जात आहेत.

शी यांनी काही राजकीय विश्लेषकांच्या संदर्भाने म्हटले की, हा तणाव संपवण्यासाठी नवी दिल्लीसोबत नाते सरळ करणे चीनसाठी सोपे नाही. कारण अमेरिका आणि जगातील अन्य मोठ्या शक्तीसुद्धा भारताला साथ देत आहेत. हा चीनच्या कूटनितीला मोठा धक्का आहे. एक क्षेत्रीय ताकद म्हणून उदयास येणार्‍या भारताची अमेरिकेसोबत वाढती जवळीक पाहता भारत आता चीनच्या अजेंडामध्ये खुप वर आलेला आहे. मागील दोन दशकात भारत खुप बदलला आहे. आणि एक आशियाई महाशक्ती बनला आहे. शी यांनी हेदेखील म्हटले की, चीनला जेव्हा अमेरिकेशी वाढत्या कटुतेसह अनेक मोर्च्यांवर कूटनिती आणि आव्हानांचा सामना करावा लागत आहे, तेव्हा हे मोठे दुर्भाग्य आहे की, अशा स्थितीत तो भारताशी वाद घालत आहे. लेखकाने सल्ला दिला आहे की, चीनला आता डॅमेज कंट्रोलचे काम केले पाहिजे.