उत्तर गोलार्धात सर्वात कमी तापमानाची नोंद, WMO नं 3 दशकानंतर जाहीर केले आकडे

जिनिव्हा : वृत्तसंस्था – पृथ्वीच्या वाढत्या तापमानाची मोठी चर्चा सुरू असताना उत्तर गोलार्धात सर्वात कमी तापमानाची माहिती मिळाली आहे. संयुक्त राष्ट्राच्या हवामानसंबंधी एजन्सीनुसार, सुमारे तीन दशकांपूर्वी ग्रीनलँडमध्ये सुमारे मायनस 70 डिग्री सेल्सियस (मायनस 93 डिग्री फॅरनहाईट) तापमान रेकॉर्ड केले गेले होते.

जागतिक हवामान शास्त्र संघटनेने (डब्यूएमओ) आता जाहिरपणे यास दुजारो देताना म्हटले आहे की, 22 डिसेंबर 1991 ला उत्तर गोलार्धात शून्याच्या खाली म्हणजे मायनस 69.6 डिग्री सेल्सियस तापमान नोंदले गेले होते. सुदूर क्लिंक नावाच्या ठिकाणावर स्थापन करण्यात आलेल्या स्वयंचलित केंद्रावर हे तापमान रेकॉर्ड केले गेले होते. हे ठिकाण ग्रीनलँड हिमखंडाच्या जवळ आहे आणि समुद्र सपाटीपासून 10,000 फुटाच्या उंचीवर आहे.

डब्ल्यूएमओचे महासचिव प्रोफेसर पेटरी तालास यांनी एका वक्तव्यात सांगितले की, पृथ्वीवर तापमान वाढण्याची चर्चा सुरू असताना ही माहिती हवामान बदलाचे भीषण चित्र दाखवत आहे. हे तापमान 1933 मध्ये ओइमकोनच्या सैबेरिया साइट आणि 1892 मध्ये बर्खोयास्कमध्ये नोंदले गेलेल्या -67.8 डिग्री सेल्सियस (-90 डिग्री फॅरेनहाईट) पेक्षाही कमी आहे.

1883 मध्ये वोस्तोकमध्ये नोंदले गेले सर्वात कमी तापमान
सर्वात कमी तापमान अंटार्टिकामध्ये पृथ्वीवर आतापर्यंतचे सर्वात कमी तापमान -89.2 डिग्री सेल्सियस (-128.6 डिग्री फॅरेनहाईट) 1983 मध्ये अंटार्टिकाचे उंच ठिकाण वोस्तोक हवामान केंद्रावर नोंदले गेले होते.

1990 नंतर स्थापन झाली होती साईट
प्रो. तालास यांनी म्हटले की, क्लिंक ऑटोमेटेड वेदर साईटची सुरूवात मागील शतकाच्या नवव्या दशकात झाली होती आणि ती दोन वर्षे सुरू होती. यास ग्रीनलँड आईस शीट प्रोजेक्टच्या दरम्यान ग्रीनलँड क्रेस्टच्या आसपास हवामानसंबंधी स्थिती रेकॉर्ड करण्यासाठी डिझाईन केले होते. 1994 मध्ये यास टेस्टींगसाठी लॅबमध्ये पुन्हा पाठवण्यात आले आणि पुन्हा अंटार्टिकामध्ये वापरण्यासाठी पाठवण्यात आले.

38 डिग्रीपर्यंत पोहचले होते तापमान
एक रशियन साईट मागील काही दिवसांपूर्वी आर्कटिक सर्कलच्या उत्तरेत सर्वाधिक तापमानाचा एक नवा रेकॉर्ड नोंद केल्याने चर्चेत होती. असे समजले जात आहे की, 19 जून 2020 ला सैबेरियामध्ये तापमान 100.4 फॅरेनहाईट (38 डिग्री सेल्सियस) पर्यंत पोहचले होते, जे या वर्षातील सामान्य तापमान स्तरापेक्षा 32 फॅरेनहाईट (18 डिग्री सेल्सियस) जास्त होते.