‘कोरोना’विरूध्द लढायचंय तर जगाला न्युझीलंडपासून शिकायला हवं, चुकीची शिक्षा भोगतायेत काही देश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगात कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ३१३८९०३ वर पोहोचली आहे. तर संपूर्ण जगातील २१८०१० रुग्णांचा यामुळे मृत्यू झाला आहे. अमेरिका आणि ब्राझीलसह काही युरोपियन देशांमध्ये रुग्णांची संख्या निरंतर वाढत असताना असे काही देश आहेत ज्यांनी त्यावर नियंत्रण मिळवले आहे. यापैकी न्यूझीलंड हा एक प्रमुख देश आहे. येथे केवळ १४७४ रुग्ण आढळले आहेत आणि आतापर्यंत १९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत न्यूझीलंडमध्ये केवळ तीन नवीन प्रकरणे समोर आली असून ते कोरोनाच्या युद्धात विजयाच्या दिशेने जात आहेत, असा आरोग्य विभागाचा विश्वास आहे. येथे बांधकाम पुन्हा सुरू झाले आहे, समुद्रकिनारे सर्फिंगसाठी खुले केले गेले आहेत. सध्या मुलांना घरूनच अभ्यास आणि लोकांना घरून काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संपूर्ण जगासाठी न्यूझीलंडकडून शिकण्याची वेळ आली आहे.

खरं तर, जगात कोरोनाचा प्रकोप झाल्यामुळे काही देशांनी वेळेवर आणि योग्य निर्णय घेतले, त्यामुळे तिथे कोरोनाचा प्रभाव कमी दिसून येत आहे. तसेच जिथे निर्णय घेण्यास उशीर झाला, तिथे प्रादुर्भाव अधिक दिसून येत आहे. याचा जीवंत पुरावा म्हणजे युरोमधील बर्‍याच देशांव्यतिरिक्त अमेरिका आणि ब्राझील आहे. गेल्या २४ तासांत ब्राझीलमध्ये संक्रमणाची ४६१३ प्रकरणं समोर आली असून संक्रमितांची संख्या ६८,१८८ झाली आहे. एका दिवसात संक्रमणामुळे ३३८ लोकांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या वाढून ४,६७४ झाली आहे. ब्राझीलने संसर्ग रोखण्यासाठी गांभीर्य दाखवले नाही. राष्ट्रपती जेयर बोल्सनारो यांनी याला एक सामान्य फ्लू सांगत कोणत्याही प्रकारच्या लॉकडाऊनची गरज नसल्याचेही त्यांनी म्हटले. परिस्थिती अशी आहे की रिओ डी जेनेरियोसह चार मोठ्या शहरांत आरोग्य सेवा कमी पडत आहेत.

कोरोनामुळे स्पेन हा युरोपमधील सर्वाधिक प्रभावित देश आहे. तिथे पहिले प्रकरण ३१ जानेवारी २०२० रोजी समोर आले होते, तर लॉकडाऊन १४ मार्चला घोषित करण्यात आले होते. २९ मार्च रोजी कोणत्याही अनावश्यक वस्तूंसाठी घराबाहेर जाण्यास बंदी होती. जर्मनीमध्ये याचे पहिले प्रकरण २७ जानेवारी रोजी आले होते आणि २२ मार्च रोजी सरकारने लॉकडाऊन जाहीर केले होते. तसेच ब्राझीलमध्ये याचे पहिले प्रकरण २६ फेब्रुवारी रोजी समोर आले होते. त्यानंतरही सरकारने गंभीरता दाखवली नाही, यामुळे तेथे प्रकरणं वाढतच राहिली. येथे लॉकडाऊन लागू झाले नव्हते, परंतु न्यूझीलंडमध्ये २८ फेब्रुवारी रोजी पहिले प्रकरण समोर आले होते. या प्रकरणानंतर सरकारने सर्व मोठी पावले उचलण्यास सुरवात केली.

यामुळे न्यूझीलंडमध्ये कमी प्रकरणं

२९ फेब्रुवारीला न्यूझीलंडमध्ये कोरोनाची एकूण १४७४ प्रकरणे समोर आली होती आणि १९ लोकांचा मृत्यू झाला होता. देशातील सर्व २० जिल्हा मंडळांमध्ये ही प्रकरणे समोर आली होती.
१९ मार्च २०२० रोजी न्यूझीलंडने बाहेरून येणाऱ्यांसाठी सीमा पूर्णपणे बंद केल्या होत्या.
१० एप्रिल रोजी न्यूझीलंडलाने परत येणार्‍या प्रत्येक नागरिकाला दोन आठवड्यांसाठी क्वारंटाइन केले.
न्यूझीलंडमधील कोरोनाची सतर्कता पातळी २१ मार्च रोजी २ होती, ती दोन दिवसात ३ झाली होती. त्यानंतरच्या दोन दिवसांत २५ मार्च रोजी त्याची पातळी ४ झाली होती.

२५ मार्च रोजी न्यूझीलंडमध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आले. सर्वांना घराबाहेर पडण्यास मनाई होती.
लॉकडाऊन दरम्यान केवळ अत्यावश्यक सेवेत असलेल्या कर्मचार्‍यांना घर सोडण्याची परवानगी होती.
यातील सर्वात महत्वाची बाब म्हणजे येथील नागरिकांनी त्याला अत्यंत गांभीर्याने घेतले आणि सरकारच्या गोष्टींचे पूर्ण पालन केले.

मास्क, सॅनिटायझर किंवा साबणाने हात धुणे, घरातून बाहेर पडल्यावर दुसर्‍या व्यक्तीपासून अंतर ठेवणे अशा नियमांचे पूर्णपणे पालन केले गेले. यामुळे २७ मार्च रोजी सतर्कता पातळी ३ झाली होती. याचा अर्थ असा की देशात नवीन प्रकरणे कमी होत होती आणि रुग्ण बरे होत होते. २७ एप्रिल रोजी सरकारने काही गोष्टी तात्पुरत्या उघडण्यास परवानगी दिली आणि २९ एप्रिल रोजी न्यूझीलंडमध्ये एकाही सक्रिय प्रकरणाची नोंद झाली नाही.