स्टुडिओत घुसलं माकड, महिला अँकरनं काढला पळ, जाणून घ्या पुढं काय काय झालं ! (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   एक अशी घटना समोर आली आहे ज्यात स्टुडिओत अचानक माकड घुसल्यानं एक महिला अँकर स्टुडिओ सोडून पळून गेली आहे. त्या माकडानं थेट महिला पत्रकाराच्या पायावरच हल्ला केला होता. याचा एक व्हिडीओदेखील समोर आला आहे जो सध्या व्हायरल होत आहे.

सुरू होता लाईव्ह शो

मीडिया रिपोर्ट्सनुसार, इजिप्तच्या अल हयात टीव्हीच्या पत्रकार लुबना असल स्टुडिओत लाईव्ह शो करत होत्या. स्टुडिओत त्यांचा सहयोगी सद्दाम हद्दाह हेही उपस्थित होते. ज्याला स्टुडिओत मुलाखतीसाठी बोलवण्यात आलं होतं त्यानं सोबत पाळलेलं माकड आणलं होतं. यानंतर महिला अँकरनं त्या माकडाला आपल्या चेअरवर म्हणजेच मांडीवर बसवलं आणि पाहुण्यांना प्रश्न विचारायला सुरुवात केली.

माकडानं अचानक महिला अँकरच्या दिशेन उडी घेतली. यानंतर महिला अँकर त्याला दूर करू लागली पण ते माकड वाकड्या तिकड्या उड्या मारू लागली. यानंतर घाबरून महिला अँकरनं स्टुडिओच्या सेटवरूनच पळ काढला.

महिला अँकरचा एक व्हिडीओ समोर आला आहे जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी व्हिडीओ शेअर केला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like