WHO ने मेक्सिकोबद्दल जारी केला अलर्ट, धोकादायक स्तरावर पोहचू शकतो ‘कोविड-19’ चा प्रसार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) प्रमुखांनी सांगितले आहे की, मेक्सिकोमध्ये कोरोना विषाणूचा धोका आणखी वाढू शकतो. डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस अॅडनॉम घब्रेयियस म्हणाले की, मेक्सिकोमधील परिस्थिती चिंताजनक होऊ शकते.
दरम्यान, मेक्सिकन सरकारने म्हटले आहे की, जानेवारीमध्ये कोरोना विषाणू धोकादायक स्तरावर वाढू शकेल. मेक्सिकोमध्ये कोविड -19 मुळे मृतांचा आकडा 1 लाखाच्या पुढे गेला आहे. अमेरिका, ब्राझील आणि भारत नंतर मेक्सिको चौथा देश आहे, जिथे कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यूची संख्या एक लाखाहून अधिक झाली आहे.