स्टार प्लेअर ‘दुती चंद’ला लक्झरी कार विकायला भाग पडावं लागतंय, जाणून घ्या कारण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   भारतीय अ‍ॅथलेटिक्स स्टार दुती चंद (Dutee Chand) वर कोरोना विषाणूचा बराच परिणाम झाला आहे. गेल्या एक वर्षापासून त्यांनी ऑलिम्पिकच्या तयारीवर बरीच रक्कम खर्च केली. ऑलिम्पिक लांबणीवर पडल्यामुळे त्यांची तयारी आणि पैसा सर्वच वाया गेला आहे. दुती अद्याप ऑलिम्पिकसाठी पात्र ठरू शकल्या नाहीत आणि सध्या भुवनेश्वरमध्ये त्या तयारी करीत आहेत. तथापि, तयारीसाठी त्यांना पैशांची आवश्यकता आहे, ज्यामुळे त्यांना आपली बीएमडब्ल्यू कार विकावी लागत आहे. दुती चंद यांनी कार विक्रीसाठी सोशल मीडियावर फोटो टाकले होते पण नंतर ही पोस्ट काढून टाकली.

प्रशिक्षणासाठी विकत आहेत कार

दुती यांनी सन 2015 मध्ये BMW-3 सिरीज मॉडेल कार 30 लाख रुपयांमध्ये खरेदी केली होती. तथापि कोरोना विषाणूच्या दिवसेंदिवस बिघडत चाललेल्या परिस्थितीत त्यांनी आपल्या प्रशिक्षणासाठी ही कार विकण्याचा निर्णय घेतला आहे. दुती यांनी याबाबत एका वृत्तपत्राला सांगितले की, ‘कोविड -19 साथीच्या आजारामुळे कोणताही स्पॉन्सर माझ्यावर खर्च करण्यास तयार नाही. सरकारचे लोकसुद्धा सांगत आहेत की मला पैसे देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. पुढच्या वर्षीच्या ऑलिम्पिक खेळांच्या प्रशिक्षण आणि डाएटसाठी मला पैशांची गरज आहे. म्हणूनच मी माझी बीएमडब्ल्यू कार विकण्याचा निर्णय घेतला आहे.’

कार विक्रीसाठी फेसबुकवर टाकली होती पोस्ट

ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेतील दुतीच्या कामगिरीबद्दल त्यांना पुरस्कार म्हणून तीन कोटी रुपये दिले होते. या पैशांनी दुतीने घर बांधले आणि कार खरेदी केली. दुती यांनी कारची छायाचित्रे फेसबुकवर पोस्ट केली आणि लिहिले की ज्याला बीएमडब्ल्यू खरेदी करायची असेल त्याने त्यांना मॅसेज करावा. तथापि, नंतर त्यांनी ही पोस्ट हटविली.

टॉप्स च्या भाग नाहीत दुती चंद

दुती यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्याकडे आणखी दोन कार आहेत, अशा परिस्थितीत त्यांनी लक्झरी कार विकण्याचा विचार केला. त्यांना जर्मनीला जाऊन प्रशिक्षण घ्यायचे आहे आणि त्यासाठी तिकिट आधीच मिळालेले आहे, परंतु सर्व स्पॉन्सर मागे हटले आहेत. जकार्ता एशियन गेम्स 2018 मध्ये 100 मीटर रौप्यपदक जिंकणाऱ्या दुती चंद या क्रीडा मंत्रालयाच्या लक्ष्य ऑलिम्पिक पोडियम स्कीमच्या (टॉप्स) भाग नाहीत. त्यांचे प्रायोजक ओडिशा सरकार व केआयआयटी हे करत होते परंतु ते केवळ टोकियो ऑलिम्पिक 2020 पर्यंतच होते. आता त्यांनी स्वत:ची जबाबदारी स्वीकारण्याचे निश्चित केले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like