Live सामन्या दरम्यान 7 महिन्याच्या बाळाला पाजले दूध, सोशल मीडियावर फोटो ‘व्हायरल’

नवी दिल्ली : मिझोरम स्टेट गेम्स २०१९ मध्ये सोमवारी व्हॉलीबॉल सामन्यादरम्यान कोर्टवर एक वेगळेच दृश्य पाहायला मिळाले, ज्यामुळे केवळ प्रक्षकांचीच नव्हे तर सोशल मीडियावरही चाहत्यांची मने जिंकली आहेत. मिझोरम स्टेट गेम्स २०१९ आयझॉलमध्ये खेळले जात आहेत. त्याअंतर्गत कोर्टमध्ये महिला खेळाडूंचा व्हॉलीबॉल सामना सुरू होता. सामन्यादरम्यान हाफ टाईम हूटर वाजताच या सामन्यात सहभागी एका खेळाडूने कोर्टबाहेर येत आपल्या बाळाला दूध पाजले.

दरम्यान, मिझोरमच्या टुइकुम प्रदेश संघातील खेळाडू लालवेंतलुआंगी व्हॉलीबॉल सामना खेळात होती. सामन्यात दोन्ही खेळाडूंमध्ये प्रत्येकी एका अंकासाठी बराच संघर्ष सुरु होता. यावेळी, रेफरीने हाफ-टाइम हूटर वाजवला. जसा हूटर वाजला अशी लालवेंतलुआंगी कोर्टबाहेर गेली आणि तिच्या सात महिन्यांच्या मुलाला दूध पाजू लागली. यावेळी कोणीतरी तिचे छायाचित्र सोशल मीडियावर शेअर केले. त्यानंतर हा फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आणि चाहत्यांनी लालवेंतलुआंगी जोरदार कौतुक देखील केले.

फेसबुक यूजर निंगलुन हंघाल याने लालवेंतलुआंगी चे हे चित्र सोशल मीडियावर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘सामन्यादरम्यान आपल्या ७ महिन्यांच्या मुलाला दूध पाजण्यासाठी चोरलेला एक क्षण ‘ निंगलून असेही लिहिले कि, ‘ लालवेंतलुआंगी यांनी हे चित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे आणि खेळाडू आणि आई होण्याची दुहेरी जबाबदारी पार पाडण्यासाठी लोक लालवेंतलुआंगी यांचे कौतुक करीत आहेत.

१० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर :
इतकेच नाही तर निंगलून यांनी सोशल मीडियावर शेअर केलेले चित्र क्रीडामंत्र्यांपर्यंत पोहचले, त्यानंतर त्यांनी लालवेंतलुआंगी यांना आर्थिक मदत देण्याचे ठरविले. मिझोरमचे क्रीडामंत्री रॉबर्ट रोमाव्हिया रॉयते यांनी ट्विटरवर हे चित्र शेअर करताना म्हटले आहे की, “लालवेंतलुआंगी उत्साह वाढविण्यासाठी क्रीडा मंत्रालयाने दहा हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. मिझोरम स्टेट गेम्स २०१९ हे ९ डिसेंबर ते १३ डिसेंबर दरम्यान घेण्यात येणार आहे.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like