सामन्यादरम्यान मेरीकॉमनं मला ‘शिव्या’ दिल्या, पराभवानंतर निकहत जरीननं सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सहावेळी आंतरराष्ट्रीय चॅम्पियन एम सी मेरीकॉमने शनिवारी निकहत जरीनला 9-1 ने पराभूत करुन चीनमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या ऑलिंपिक क्वालिफायरसाठी भारतीय संघात जागा मिळवली. या 36 वर्षीत मेरीकॉमने दमदार प्रदर्शन करत स्पष्ट विजय मिळवला. संघात मेरीकॉमने जागा तर निश्चित केली परंतु बॉक्सिंग हॉलमध्ये तणावाचे वातावरण होते. सामन्यादरम्यान रिंगच्याबाहेर मोठा वाद निर्माण झाला. जेव्हा निकाल घोषित करण्यात आला, तेव्हा जरीनच्या राज्य तेलंगाना संघाचे काही प्रतिनिधी याला विरोध करु लागले.

मेरी कोम म्हणाली –
सामना जिंकल्यानंतरही मेरी कोमने स्वतःला ज्युनियर निकहत जरीनला लक्ष्य केले असल्याचे समजले. मेरीकॉम चाचणी सामना खेळताना रागावलेली दिसली आणि म्हणाली, मला माहित नाही, मला अजून किती वेळा स्वतःला सिद्ध करावे लागेल. मला कोणत्याही प्रकारचा वाद नको आहे. आता माझे लक्ष फक्त देशासाठी पदक आणण्यावर आहे. निकहत जरिनशी हात न मिळवण्याबाबत मेरी कॉम म्हणाली, मी निकहतबरोबर हात का मिळवला नाही ? जर तिला इतर लोकांनी तिचा आदर करावा असे वाटत असेल तर पहिल्यांदा तो आदर तिने स्वतः करावे. मला लोकांचे असे वागणे आवडत नाही. ती रिंगमध्ये काय म्हणते ते सिद्ध करा, यातून नाही.

निकहतने आरोप केला की मेरीकॉमने सांगितले की मी हा वाद निर्माण केला नाही. मी असे कधीही सांगितले नाही की मी ट्रायलसाठी येणार नाही. त्यामुळे मी हे सहन करु शकत नाही. जर कोणी आरोप लावत असेल की माझी चूक होती तर ही चूक माझी नाही आणि माझे नाव यात उगाचच आणले जाणे योग्य नाही. जरीन म्हणाली की, त्यांनी जसे वर्तन केले ते मला माहिती आहे, तिने रिंगच्या आत अभद्र भाषेचा वापर केला परंतु ठीक आहे. त्या म्हणाल्या की मी ज्यूनिअर आहे, सामना संपल्यानंतर त्यांनी अलिंगन दिले असते तर बरे झाले असते. परंतु मी यावर काहीही बोलू इच्छीत नाही.

तेलंगणा संघाच्या अधिकाऱ्यांनी केला आरोप –
तेलंगणा संघाच्या प्रतिनिधित्व करणाऱ्या एपी रेड्डी यांनी या निर्णयाला जोरदार विरोध केला. भारतीय महासंघाचे अध्यक्ष अजय सिंह यांनी यावेळी मध्यस्थी करत वाद नियंत्रित केला. अजय सिंह यांनी त्यांना रिंग पासून बाजूला जाण्यास सांगितले आणि नाराज जरीन यांनी त्यांना शांत केले. रेड्डी यांनी यानंतर पत्रकार परिषद घेऊन सांगितले की या प्रकारच्या राजकारणाने बाकी बॅक्सर कसे पुढे जातील. अजय सिंह म्हणाले की मेरीकॉमबाबत कोण काय बोलणार, त्या प्रतिभावान बॉक्सर आहेत. निकहतचे सांगायचे झाले तर त्यांच्याकडून भविष्यात चांगली अपेक्षा आहे आणि या सामन्यात त्यांनी आम्हाला प्रभावित केले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/