पुलेला गोपीचंद यांच्यासोबत लज्जास्पद घटना ! BAI च्या ऑनलाइन वर्गात ‘अश्लील’ चित्रे

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   कोरोना व्हायरसच्या काळात, सर्व प्रशिक्षक आणि महासंघांनी खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासाठी ऑनलाइन कोचिंग सुरू केले आहे. सोमवारी बीएआयनेही झूम अॅपच्या मदतीने कोचिंग सुरू केले. त्याचे पहिले सत्र खूप यशस्वी ठरले होते, ज्यात राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद देखील सहभागी झाले होते. दरम्यान, शुक्रवारी येथे असे काही घडले की, पुलेला गोपीचंद यांच्यासह परदेशी प्रशिक्षकांनाही लाज वाटली. खेळाडूंना देण्यात येणाऱ्या ऑनलाइन व्हिडिओ वर्गात अचानक अश्लील चित्रे दिसू लागली.

परदेशी प्रशिक्षक आणि गोपीचंद यांचादेखील वर्गात समावेश

बाई ( BAI) 21 दिवस खेळाडूंसाठी हा कोचिंग क्लास ठेवला होता. इंडोनेशियन प्रशिक्षक अगस ड्वी, नमरीह संतुसु आणि गोपीचंदसुद्धा हा क्लास पाहत होते. त्यानंतर एका हॅकरने हा व्हिडिओ क्लास हॅक केला आणि अश्लील चित्रे वर्गात दिसू लागली. माहितीनुसार, जेव्हा घडले तेव्हा संतुसू या वर्गाचे प्रमुख होते. त्यांनी सांगितले की, हे थोड्या वेळासाठी थांबले परंतु नंतर ते पुन्हा होऊ लागले. संपूर्ण क्लासदरम्यान बर्‍याचदा असे घडले. दुसर्‍या कोचने सांगितले की, या वर्गात बरीच लहान मुलं आणि पालकही सहभागी झाले होते. तसेच झूममध्ये बर्‍याच वेळा असे घडले आहे आणि आता या संपूर्ण घटनेचा तपास केला जात आहे.

दरम्यान, हा कार्यक्रम हॅक झाल्याचे साईनी नाकारले. त्यांनी सांगितले की हे सर्व तांत्रिक कमतरतेमुळे झाले. साईच्या आयटी विभागाने एका निवेदनात म्हटले आहे की, “ऑनलाईन कार्यशाळेतील तांत्रिक कमतरतेमुळे काही अवांछित छायाचित्रे पडद्यावर दिसू लागली. दरम्यान, आम्ही तपास केला आहे आणि झूम व्हिडिओमध्ये हॅकिंग झाले नाही.

आठ महिने चालणार हा कार्यक्रम

बीएआयच्या पूर्वीच्या कोच विकास कार्यक्रमात देशभरातील सुमारे 800 सहभागींनी भाग घेतला. हा कार्यक्रम 8 मे पर्यंत चालू राहणार आहे. तीन आठवड्यांपर्यंत आठवड्यातून पाच दिवस हा क्लास असेल आणि संपूर्ण अभ्यासक्रम 39 विषयांमध्ये विभागला जाईल. यामुळे प्रशिक्षकांना भारतीय बॅडमिंटन संघाचे मुख्य प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांच्या नेतृत्वाखालील उच्च स्तरीय प्रशिक्षकांकडून तपशीलवार शिकण्याची संधी मिळेल. या प्रसंगी गोपीचंद म्हणाले होते की, ‘हा एक उत्तम मंच आहे, जेथे परदेशी प्रशिक्षकांच्या अनुभवामुळे आपल्या देशातील प्रत्येक स्तरावरील प्रशिक्षकांचे कौशल्य सुधारण्यास मदत होईल. अशा गोष्टी कोचिंग आणि मूलभूत दृष्टिकोनात आश्चर्यकारक असतात, ज्याचा कोणी लॉकडाऊनमध्ये विचार केला नव्हता.