‘या’ महिला खेळाडूनं Suicide थांबविण्यासाठी बनविला होता ‘व्हिडिओ’, मात्र स्वत:च केली आत्महत्या !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  –  डिप्रेशन ही सध्याच्या काळाची सर्वात मोठी समस्या बनली आहे. मोठ-मोठे स्टार्स, खेळाडू नैराश्यामुळे आपला जीव घेतात. असेच काहीसे एका मोठ्या महिला अ‍ॅथलीटने स्वतःसोबत केले होते. आपण अ‍ॅश्ले मसारो (Ashley Massaro) बद्दल बोलत आहोत, ज्या की डब्ल्यूडब्ल्यूई (WWE) मधील रेसलर होत्या आणि मे 2019 मध्ये त्यांचे निधन झाले होते. मसारो त्यांच्या घरीच मृत अवस्थेत सापडल्या आणि त्यांनी आत्महत्या केली होती.

आश्चर्याची बाब म्हणजे आत्महत्येविरूद्ध मसारो स्वत: एक म्युझिक व्हिडिओ बनवित होत्या. म्हणजे त्या आपल्या व्हिडिओद्वारे लोकांना संदेश देत होत्या की लोकांनी आपला जीव देऊ नये. हा व्हिडिओ त्यांनी डिसेंबर 2018 ते जानेवारी 2019 दरम्यान शूट केला होता, परंतु चार महिन्यांनंतर त्यांनी स्वत:च आत्महत्या केली.

अ‍ॅश्ले मसारोचा हा व्हिडिओ लवकरच प्रसिद्ध होणार आहे, कारण त्यांच्या निधनानंतर त्याचे लॉन्चिंग पुढे ढकलण्यात आले होते. मात्र, आता मसारोच्या कुटुंबीयांच्या परवानगीनंतर हा व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात येत आहे. अ‍ॅश्ले मसारोने नैराश्यामुळे आपला जीव घेतला होता. मसारो डब्ल्यूडब्ल्यूई रेसलर होण्यासोबतच एक मॉडेल देखील होत्या. त्यांचे लाखो चाहते होते. मसारो आपल्या मागे एक मुलगी सोडून गेल्या आहेत.