…… अन्यथा 9 ऑगस्टला मराठा समाज रस्त्यावर उतरणार 

परळी : पोलिसनामा ऑनलाईन

मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकार कडून प्रयत्न सुरु आहेत. आज पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या प्रतिष्ठित व्यक्तींसोबत बैठक घेतली आणि कालबद्ध आरक्षण देऊ असा पुनरुच्चार केला. सरकार जर इतर ठिकाणच्या मराठा कार्यकर्त्यांशी चर्चा करत असेल, तर आम्हास ते मान्य होणार नाही, जी चर्चा करायची आहे, ती येथूनच होईल.  तसेच ७ ऑगस्ट पर्यंत निर्णय घेतला नाही तर मराठा समाज ९ ऑगस्ट ला रस्त्यावर उतरेल असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे आबा पाटील यांनी दिला आहे.
[amazon_link asins=’B075FY4RWK’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a07a3bed-9652-11e8-b3ea-db02cae86059′]

सरकारकडून 7 ऑगस्टपर्यंत योग्य निर्णय घेण्यात यावा आणि आरक्षणासंबंधी लेखी आश्वासन द्यावे. अन्यथा 9 ऑगस्टला राज्यभरात मराठा समाज रस्त्यावर उतरेल, असा इशारा परळीतील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आबा पाटील यांनी दिला आहे. आज (गुरुवार) मराठा क्रांती मोर्चाची बैठक झाली. आरक्षणासाठी मागील 16 दिवसांपासून परळीत ठिय्या आंदोलन सुरु आहे. लेखी आश्वासनाशिवाय हे आंदोलन मागे घेणार नाही, असे पाटील यांनी स्पष्ट केलंय.

या आहेत ठळक मागण्या –
-७ ऑगस्ट पर्यंत मराठा आरक्षणासंबंधी निर्णय घ्यावा.
-राज्य सरकार करत असलेली मेगा भरती स्थगित करून मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय भरती करु नये.
-भरती संदर्भात सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी लेखी द्यावे.
-कोपर्डी घटनेतील आरोपींना तात्काळ शिक्षा देण्यात यावी.
-आंदोलनावेळी ज्यांनी आत्महत्या केली त्यांच्या कुटुंबियांना सरकारनं योग्य मदत द्यावी.