…अन्यथा एल्गार परिषदेचा खटला रद्द होईल, सुप्रिम कोर्टाने सुनावले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

एल्गार परिषद प्रकरणी संपूर्ण देशभरात अटक करण्यात आलेल्या ५ मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या अटकेवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी पार पडली. सुनावणीवेळी कोर्टाने सर्व पुरावे पाहूनच यावर निर्णय घेण्यात येईल. जर यावर समाधानकारक पुरावे नसतील, तर हा खटला रद्दही होऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

[amazon_link asins=’B01NCUMUE6′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’42bb9472-ba8b-11e8-afd1-45fa9a99f650′]

एल्गार परिषद प्रकरणी अटक केलेल्या पाच जणांबाबत आज कोर्टात सुनावणी झाली. यात पुणे पोलीसांनी सादर केलेले पुरावे बनावट असल्याचे आढळून आल्यास एसआयटी नियुक्त करु असा संकेत आज कोर्टाने दिला. या प्रकरणी पुढील चौकशी १९ सप्टेंबर रोजी होणार आहे. तो पर्यंत त्या पाच ही जणांना नजर कैदेत ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले आहे. बुधवारी या प्रकरणाचा अंतिम निकाल येण्याची शक्यता आहे.

कोरेगाव भीमा प्रकरणी कोणत्याही समितीची स्थापना नाही 

आरोपींना आपल्या ताब्यात द्याव, अशी मागणी करत पलिसांनी जमा केलेले पुरावे पहावेत, अशी विनंती रज्य सरकारने केली होती. अटक ही ठोस पुराव्यांच्या आधारावरच झालेली आहे. अस कोर्टात सांगण्यात आले. पोलिसांनी जमा केलेले पुरावे सीलबंद लिफाफ्यात कोर्टासमोर सादर करण्यात आले.

[amazon_link asins=’B073554FPW’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’49d9f05a-ba8b-11e8-b291-e98d94a13eaf’]

एल्गार परीषद प्रकरणात अटक असलेल्या पाच जणांच्या खटल्यावर दुपारी 12 वाजता सुनावणी सुरु झाली. दोन्ही पक्षांच्या सहमतीने कोर्टाची वेळ निश्चित केली. पण सुनावणी काही वेळासाठी टाळावी, अशी विनंती याचिकाकर्त्यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी केली. याशिवाय राज्य सरकारच्या वकिलांनीही काही दस्तावेज जमा करण्याबाबत सांगितलं, ज्यामुळे सुनावणी 12 वाजता सुरु करण्यात आली. खटल्यांच्या सूचीमध्ये सुनावणीसाठी हे प्रकरण तिसऱ्या क्रमांकावर होतं.

पुण्यातील रास्त भाव धान्य दुकानांचे होणार सर्वेक्षण

यापूर्वी एल्गार परिषद प्रकरणात अटक केलेल्या पाच जणांच्या खटल्यावरील सुनावणी 17 सप्टेंबरपर्यंत टाळण्यात आली होती. त्यामुळे 17 सप्टेंबरपर्यंत सुनावणीपूर्वी दिलेला अंतरिम आदेशच लागू राहिल, असं कोर्टाने सांगितलं होतं, ज्याअंतर्गत पाच जणांना नजरकैदेत ठेवलं जाईल.