OTT Release Marathi Movie | ओटीटी प्लॅटफॉर्मवर या आठवड्यात ‘हा’ धमाल कॉमेडी चित्रपट रिलीज; चित्रपटाच्या विषयाने वेधले लक्ष

पोलीसनामा ऑनलाइन – OTT Release Marathi Movie | मराठी चित्रपटसृष्टीला आता सुगीचे दिवस येऊ लागले असून मराठी प्रेक्षक चित्रपटगृहांमध्ये देखील गर्दी करत आहेत. तसेच ओटीटी माध्यमांवर देखील मराठी चित्रपटांचा व वेबसिरीजचा (Webseries) डंका दिसून येतो आहे. तरुण वर्गाला देखील ओटीटीवर रिलीज (OTT Release Marathi Movie) होणाऱ्या मराठी चित्रपटांची प्रतिक्षा असते. भरपूर मनोरंजन करणारा आणि खळखळून हसायला लावणारा ‘बायको देता का बायको’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अफलातून कॉमेडी चित्रपट (Comedy Movie ) ‘बायको देता का बायको’ हा ‘अल्ट्रा झकास’ या ओटीटी माध्यमावर या आठवड्यामध्ये रिलीज होणार आहे. संपूर्ण कुटुंबासोबत घरी बसून धमाल कॉमेडी चित्रपट पाहण्याचा प्लॅन करत असाल तर ‘बायको देता का बायको’ (Bayko Deta Ka Bayko) चित्रपट तुमचे खूप मनोरंजन करेल.

मराठी चित्रपट हे त्यांच्या हटक्या विषयांसाठी आणि गंभीर विषय अगदी सहजतेने मांडणाच्या कौशल्यासाठी नावाजला जातो.
‘बायको देता का बायको’ या चित्रपटाचा विषय देखील असा हटके असून आजच्या समाजाचे प्रतिबिंब मांडणारा आहे.
चित्रपटाचा विषय हा गंभीर असला तरी अगदी हसवून चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा आहे.
यामध्ये ऐन तारुण्यामध्ये लग्नसाठी इच्छुक असणाऱ्या तरुणांना आजच्या युगामध्ये बायको मिळणे किती कठीण
झाले आहे हे दाखवण्यात आले आहे. पण असं का व्हावं? या मागचे नेमके कारण काय असेल? याचा गंभीर मुद्दा विनोदीशैलीमध्ये चित्रपटात मांडण्यात आला आहे. येत्या 18 सप्टेंबरला ‘बायको देता का बायको’ हा चित्रपट ‘अल्ट्रा झकास’ (Ultra Jhakaas ) या मराठी ओटीटीवर चॅनेलवर रिलीज (OTT Release Marathi Movie) होणार आहे.

लग्न हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये महत्त्वाचे आहे.
मात्र सध्या मुलींच्या वाढत्या अपेक्षा आणि समाजिक स्थिती यामुळे लग्न होणे अवघड होऊन बसले आहे.
याच गंभीर मुद्द्यांवर चित्रपटाच्या माध्यमातून उजेड टाकण्यात आला आहे.
तरुणांना योग्य नोकरी नसल्यामुळे बायको शोधण्यासाठी कसा आणि किती संघर्ष करावा लागतो हे ‘बायको देता का बायको’ या चित्रपटामध्ये दाखवण्यात आले आहे. ‘बायको देता का बायको’ चित्रपटाचे दिग्दर्शन सुरेश साहेबराव ठाणगे यांनी केले आहे. चित्रपटामध्ये विनोदी अभिनेते सुनील गोडबोले, सिद्धेश्वर झाडबुके, अभिलाषा पाटील, किशोर ढमाले, श्वेता कुलकर्णी, आरती तांबे, प्रतीक पडवळ या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Advt.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CM Eknath Shinde On Viral Video | ‘मुद्दामहून काही विरोधक लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचे काम करतायत’, ‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

Amol Mitkari on Rohit Pawar | रोहित पवार व अमोल मिटकरी यांच्यामध्ये ट्विटर वॉर; मिटकरी म्हणाले,“तुम्ही लहान आणि नवखे…”