OTT Release This Week | हा आठवडा असेल कॉमेडी, ड्रामा, सस्पेन्स आणि रोमान्सने परिपूर्ण ! ‘हे’ चित्रपट आणि मालिका होणार प्रदर्शित

पुणे – पोलीसनामा ऑनलाइन  – OTT Release This Week | OTT उत्साही लोकांसाठी या आठवड्यात भरपूर साहित्य आहेत. कपिल शर्माच्या ( Kapil Sharma ) चाहत्यांसाठी तसेच यात अ‍ॅक्शन, रोमान्स, ड्रामा, थ्रिलर आणि कॉमेडीही आहे. कोरोनापूर्वी जिथे प्रेक्षकांना थिएटरमध्ये जाण्याचा आनंद मिळत होता, आता फक्त OTT वर प्रदर्शित होणारे चित्रपट आणि वेब सिरीज प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करतात. या आठवड्याच्या यादीत ओटीटीवर बरेच काही आहे आणि ही यादी पाहून अंदाज लावला जाऊ शकतो की हा आठवडा ओटीटीच्या दर्शकांसाठी मनोरंजनाने परिपूर्ण असणार आहे ( OTT Release This Week ).

 

File photo

 

द सिनर 27 जानेवारी ( The Sinner )

OTT – Netflix

ज्यांना मनोवैज्ञानिक रहस्य आवडते त्यांच्यासाठी, द सिनर या बुधवारी OTT वर प्रदर्शित होत आहे. मागील तीन सीझनला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. तुम्ही 27 जानेवारीपासून नेटफ्लिक्सवर द सिनरचा चौथा सीझन पाहू शकता.

File photo

 

कपिल शर्मा – आई एम नाॅट डन येट ( Kapil Sharma- I am not done yet )

OTT – Netflix

कपिल या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सच्या शो ‘कपिल शर्मा – आय एम नॉट डन यट’ मध्ये दिसणार आहे. या शोमध्ये कपिल शर्मा स्टँड-अप कॉमेडी करून प्रेक्षकांना खळखळून हसवणार आहे.

 

File photo

 

ऑल ऑफ अस आर डेड ( All Of Us Are Dead )

OTT – Netflix

तुम्हाला 28 जानेवारीपासून नेटफ्लिक्सवर ऑल ऑफ अस डेड बघायला मिळेल. या मालिकेचा हा पहिला सीझन आहे. यामध्ये एका शाळेत झोम्बी व्हायरसची कथा दाखवण्यात आली आहे.

 

File photo

पवित्र रिश्ता 2.0 ( Pavitra Rishta 2.0 )

OTT-G5

अंकिता लोखंडे ( Ankita Lokhande ) आणि शाहीर शेख ( Shaheer Shaikh ) यांची लोकप्रिय टीव्ही मालिका पवित्र रिश्ता आता या आठवड्यात दुसऱ्या सीझनसह ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखल होणार आहे. या मालिकेचा प्रीमियर 28 जानेवारी रोजी Zee5 वर होणार आहे. या मालिकेत पुन्हा एकदा मानव आणि अर्चना यांची कथा प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे.

 

File photo

 

तड़प 28 जानेवारी ( Tadap )

OTT Disney+Hotstar

सुनील शेट्टीचा ( Sunil Shetty ) मुलगा अहान शेट्टीने ( Ahan shetty ) 2021 मध्ये ‘तडप’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. तडप OTT प्लॅटफॉर्म Disney Plus Hotstar वर 28 जानेवारीला म्हणजेच या शुक्रवारी स्ट्रीम होत आहे. तडप हा एक रोमँटिक अ‍ॅक्शन ड्रामा चित्रपट आहे ज्यामध्ये तारा सुतारिया मुख्य भूमिकेत आहेत.

Web Title : OTT Release This Week | ott release this week movies web series netflix disney hotstar voot select zee5

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

Income Tax Return | IT रिटर्न भरण्याची डेडलाइन आता 15 मार्चPune Corporation | समाविष्ट 23 गावांतील ‘त्या’ सोसायट्यांना पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी बिल्डरांचीच अन्यथा…AICTS Pune Recruitment 2022 | 3 री उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी ! पुण्यातील सरकारी इन्स्टिटयूटमध्ये भरती; जाणून घ्याSupreme Court | भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाच्या कारवाईवर SC चे कडक ताशेरे, ‘महाविकास’ सरकारच्या अडचणी वाढवणारं निरीक्षण नोंदवलं

TET Exam Scam | अश्विनकुमारचा धक्कादायक खुलासा ! अभिषेक सावरीकर यानेच दिले 5 कोटी रुपये; सावरीकरच्या पोलीस कोठडीत वाढ

Ajit Pawar | महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय, अजित पवारांनी दिले ‘हे’ तातडीचे निर्देश

Anti Corruption Bureau Pune | 10 हजाराची लाच घेताना मंडल अधिकाऱ्यासह खासगी इसम अँन्टी करप्शनच्या जाळ्यात