मोबाईलद्वारे ऑपरेट होणारा स्मार्ट फॅन भारतात लाँच 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात मोबाइलच्या मदतीने ऑपरेट होणार  स्मार्ट फॅन लाँच झाला  आहे. विशेष म्हणजे १६ महिन्यांच्या चाचणीनंतर या फॅनला बाजारात लाँच करण्यात आले आहे.या फॅनची किंमत ३ हजार ९९९ रुपये इतकी आहे. तसेच याच्यासोबत मिळणाऱ्या रिमोटची किंमत १४९ रुपये इतकी आहे.

लावा इंटरनॅशनलच्या Ottomate इंटरनॅशनल कंपनीने हा स्मार्ट फॅन लाँच केला आहे. फॅनला मोबाइलमधील एका अ‍ॅपच्या साहायाने कंट्रोल करता येवू शकते ज्या व्यक्तीकडे हा अ‍ॅप असेल ती व्यक्ती हा फॅन चालू-बंद करू शकते.

असा करा स्मार्ट फॅन ऑपरेट –
या फॅनमध्ये क्वालकॉमच्या चीपसेटचा वापर करण्यात आला आहे. या पंख्याला स्पीड यावी यासाठी ५ लेवल देण्यात आले आहे. पंख्याला कंट्रोल करणाऱ्याअ‍ॅपला गुगल प्ले स्टोरमधून अँड्रॉयड फोनमध्ये डाउनलोड करता येऊ शकते. अ‍ॅपमधील स्लाइडर फीचरच्या मदतीने पंख्याचा वेग कमी जास्त करता येऊ शकतो. अ‍ॅपमध्ये एक टर्बो मोड दिला असून पंख्याची स्पीड १० टक्के वाढवता येऊ शकते.

या पंख्याला २०० ब्लूटूथ डिव्हाईसच्या मदतीने कनेक्ट केले जाऊ शकते.