रिपाइं सोबत आमची युती, अडीच वर्षात महत्वाची पदे दिली : आमदार माधुरी मिसाळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – रिपाइं सोबत आमची युती आहे. अडीच वर्षात त्यांना महत्वाची पदे दिली आहेत. येत्या काळातही त्यांना विविध समित्यांची पदे दिली जातील, अशी चर्चा भाजप आणि रिपाइं वरिष्ठ नेत्यांची चर्चा झाली आहे. त्यानंतरच युतीच्या नगरसेवकांच्या उपस्थतीत महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्यात आले, अशी माहिती भाजपच्या शहर अध्यक्ष माधुरी मिसाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

याप्रसंगी खासदार संजय काकडे, स्थायी समिती अध्यक्ष सुनिल कांबळे, सभागृह नेता श्रीनाथ भिमाले, आमदार सिद्धार्थ शिरोळे, राजेश पांडे , सरस्वती शेंडगे हे यावेळी उपस्थित होते. मिसाळ म्हणाल्या, मोहोळ हे अनुभवी नगरसेवक असून पक्षाने महापौर पदासाठी मोहोळ यांचे तर उपमहापौर पदासाठी सरस्वती शेंडगे यांचे नाव निश्चित केले आहे.

रिपाइं चे पाच नगरसेवक असून त्यांना आदीचवर्षात प्रत्येकाला पद दिले आहे. भाजप नगरसेवकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे अधिकाअधिक नगरसेवकांना संधी मिळावी यासाठी प्रयत्न आहेत. उपमहापौर पदी संधी न मिळाल्याने रिपाइं चे नगरसेवक नाराज झाले होते. परंतु दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा झाली असून त्यानुसार येत्या काळात रिपाइं ला विविध समित्यांमध्ये पदे देण्यात येतील.

संजय काकडे म्हणाले, मोहोळ हे कार्यक्षम नगरसेवक आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी ते कोथरूड मतदार संघातून इच्छुक होते. परंतु पक्षाने पक्षाचे नेते चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. मोहोळ यांनी पहिल्याच दिवशी नाराजी दूर ठेवत पक्ष आदेशानुसार पक्षाचा प्रचार ही सुरू केला. यामुळे पक्षाने मोहोळ यांना संधी दिली. मोहोळ हे संपूर्ण शहरभरात काम करतील असा मला विश्वास आहे.

मोहोळ म्हणाले, की या पदासाठी अनेक नगरसेवक इछुक होते. सर्वजण या पदासाठी सक्षम होते. एकच पद असल्याने कोणाची तरी एकाची वर्णी लागणार होती. पक्षाने माझी निवड करून जो विश्वास दाखविला तो सार्थ ठरविण्यासाठी मी प्रयत्न करेन.

महापौर पद किती कालावधीसाठी ? अनिश्चितता कायम
महापौर आणि उपमहापौर पद एक वर्षासाठी असेल अशी चर्चा भाजप मध्ये सुरू होती. अगदी रिपाइं सोबत चर्चेतही हा मुद्दा मांडण्यात आला होता. परंतु भाजप शहर अध्यक्ष माधुरी मिसाळ यांनी पत्रकार परिषदेत महापौर, उपमहापौर पद किती कालावधीसाठी असेल हे पक्षाचे वरिष्ठ नेते ठरवतील असे स्पष्ट केल्याने अनिश्चितता कायम राहिली आहे.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like