Video : भाजपच्या ‘त्या’ दाव्यावरून मंत्री शिंगणे भडकले; म्हणाले – ‘भाजपवाले सपशेल खोटं बोलतायत’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोना रुग्णाला उपयुक्त असणाऱ्या रेमडीसीवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असतानाच यावरून राज्यातील राजकरणात अनेक तर्कवितर्क चर्चा होत आहे. रेमेडेसिवीर इंजेक्शन खरेदी करण्यासाठी राज्याचे अन्न आणि प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांची परवानगी घेतल्याचा दावा भाजपनं केला होता. परंतु हा दावा राजेंद्र शिंगणे यांनी फेटाळून लावला आहे. यावरून त्यांनी एक खुलासा केला आहे.

राजेंद्र शिंगणे म्हणाले, रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा आणि साठा यावरुन उलट सुलट तर्क लावले जात आहेत. यावरुन भाजप माझ्या नावाचा अपप्रचार करत आहे. कोणताही पक्ष वैयक्तिकरित्या इंजेक्शनचा साठा खरेदी करु शकत नाही. त्यांना तो सरकारला द्यावा लागतो, असे शिंगणे यांनी मंगळवारी रात्री व्हिडिओ ट्विट करत भाजप नेत्यांवर निशाणा साधला आहे. पुढे ते म्हणतात, भाजप रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा विकत घेऊन मला देणार होते अशी उलट सुलट चर्चा सोशल मीडियावर सुरु असून ते पूर्णपणे चुकीच आहे,’ असे स्पष्ट मत शिंगणे यांनी केलं आहे.

दरम्यान, राज्याचे अन्न व औषध प्रशासन विभाग आयुक्त अभिमन्यू काळे यांची मंगळवारी तडकाफडकी बदली केली आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन उत्पादक कंपन्यांकडून उपलब्ध करुन घेण्यात अपयश आल्याचा ठपका ठेवत ही बदली करण्यात आली असल्याची चर्चा आहे. अभिमन्यू काळे यांच्याकडे असलेली आयुक्तपदाची जबाबदारी आता परिमल सिंह यांच्याकडे दिली गेली आहे.