कसब्याचा विकास हाच आमचा ध्यास : खा. गिरीश बापट

रॅली, मिळावे, सभेने मुक्ता टिळक यांच्या प्रचाराची सांगता

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कसब्याचा विकास हाच आमचा ध्यास असून मुक्ताताई टिळक यांच्या माध्यमातून कसबा विधानसभा मतदारसंघातील विकास पर्व कायम राहील. विरोधकांकडे कोणतेही ठोस विकास आराखडे नाहीत तसेच केवळ सांगावे खोर आरोप करीत त्यांनी नकारात्मक राजकारण केले आहे. त्यामुळेच कसबा विधानसभा मतदारसंघातून मुक्ता टिळक यांचा विजय निश्चित आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे खासदार गिरीश बापट यांनी आज केले.

भारतीय जनता पार्टी शिवसेना आरपीआय महायुती च्या कसबा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार मुक्ता शैलेश टिळक यांच्या प्रचार सांगता सभेत खासदार बापट बोलत होते. पदयात्रा, मेळावे, रॅली आणि सभा अशा झंजावाती प्रचाराच्या माध्यमातून मुक्ता टिळक यांच्या प्रचाराची सांगता झाली. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, आरपीआय पक्षांचे नगरसेवक व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

या वेळी बापट म्हणाले,’कसबा मतदार संघ हा कार्यकर्त्यांच्या घामाने बांधलेला असल्यानेच अभेद्य आहे. आणि असाच अभेद्य राहणार आहे. केंद्र आणि राज्य सरकार व पुणे महापालिकेच्या माध्यमातून आम्ही केलेल्या विकासकामांची पावती मतदार यंदाही देतील.

उमेदवार मुक्ता टिळक म्हणाल्या, ‘विरोधकांकडे कोणते मुद्देच शिल्लक नसल्याने ते वाट्टेल ते आरोप करत आहेत. गेल्या अडीच वर्षात एवढी काम झाली तेवढी कामं याआधीच कधीच झाली नाहीत. अनेक प्रश्न सोडवले गेले आहेत. रखडलेल्या मेट्रोचे खांब उभे राहिले आहेत. मतदार सगळं बघत असतो. मतदारांनी फरक पहिला आहे. मतदार महायुतीचेच उमेदवार निवडून देणार.’ सकाळ पासून सुरू असलेल्या पावसात सर्व प्रभागांमधून कार्यकर्त्यांनी रॅली काढली होती. पावसात सभा सुरू असताना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सर्व घटकांचा पाठिंबा – मुक्ता टिळक

निवडणुक प्रचारादरम्यान सर्व घटकांनी मला उत्स्फूर्त पाठिंबा दिला आहे. कसबा विधानसभा मतदारसंघ हा बारा बलुतेदार आणि विविध जातीधर्माच्या संस्था संघटनांचा समावेश असलेला आहे. या सर्व स्तरांमधून मला भरघोस पाठिंबा देण्यात आला आहे. या सर्व घटकांच्या विकासाकरिता मी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन मुक्ता शैलेश टिळक यांनी केले.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी